डिप्पी वांकाणी, मुंबईआर्थर रोड तुरुंगाचे अधीक्षक भारत भोसले हे भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुखरूप बाहेर आले असले तरी तुरुंगाचे व्यवस्थापन करण्यात ते अकार्यक्षम ठरल्यामुळे त्यांची तेथून उचलबांगडीहोणार. भोसले यांच्यावरील भ्रष्टाचाराच्याआरोपांच्या झालेल्या अंतर्गत चौकशीत ते निर्दोष ठरले आहेत. परंतु त्यांच्यावर अहवालात तुरुंग व्यवस्थापनात अकार्यक्षम असल्याचा आरोप असल्यामुळे त्यांना त्या जबाबदारीतून मुक्त केले जाईल.हा अहवाल महानिरीक्षकांनी (तुरुंग) नुकताच राज्याच्या तुरुंग प्रमुखांना सादर केला. तुरुंगात असलेल्या बड्या कच्च्या कैदेतील आरोपींकडून (उदा. पीटर मुखर्जी, समीर भुजबळ आदी) भोसले यांनी फार मोठ्या रकमा मिळविल्याचा आरोप करणारे पत्र आर्थर रोड तुरुंगाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठविल्यानंतर भोसले यांची चौकशी करण्यात आली.आर्थर रोड तुरुंगाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेल्या सहा एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्रात भोसले यांनी मला त्यांच्या वतीने (भोसले) बड्या कैद्यांकडून जबरदस्तीने पैसे वसुल करायला भाग पाडले. समीर भुजबळ याच्याकडून भोसलेने त्याला अतिसुरक्षेच्या कोठडीत हलविण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम याच्याकडून त्याला कोणताही आजार नसताना वेगवेगळ््या रुग्णालयांत पाठविण्यासाठी कसे लाखो रुपये घेतले असा आरोप केला. आर्थिक गुन्ह्यांसाठी कच्च्या कैद्येत असलेल्या वेगवेगळ््या आरोपींकडून त्यांना महत्वाच्या व्यक्तिची वागणूक (व्हीआयपी) मिळण्यासाठी पैसे घेतले असाही आरोप त्या पत्रात करण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना घुले यांनी त्यांच्या दातांवरील उपचारांसाठीजे. जे. हॉस्पिटलला पाठविण्याऐवजी सेंट जॉर्ज हॉस्पिटलला पाठविल्याबद्दल चौकशी सुरू करण्यात आल्यानंतरच हे पत्र पाठविले. घुले यांची त्यांच्या गैरकारभाराबद्दल चौकशी झाल्यानंतर त्यांना तुरुंगाच्या सेवेतून काढून आरोग्य विभागात पाठविण्यात आले. ‘‘घुले यांनी ज्या कच्च्या कैद्यांची नावे घेतली होती त्यांचे म्हणणे नोंदवून घेण्यात आले व त्यात भोसले यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप निराधार असल्याचे आढळले. मात्र भोसले हे तुरुंगाचे व्यवस्थापन परिणामकारकतेने करण्यास पात्र नाहीत हेही आढळले. पोलीस अधीक्षक या नात्याने त्यांनी जे कर्तव्य करणे आवश्यक आहे ते त्यांनी केले नाही त्यामुळे त्यांची बदली केली जाईल,’’ असे तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आर्थर रोड तुरुंगाच्या भोसलेंची बदली होणार
By admin | Published: June 02, 2016 2:21 AM