डॉ. अमेय पांगारकरएआयतज्ज्ञ
आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र जोर धरत आहे. कामगारांपासून वरिष्ठ मॅनेजरपदापर्यंत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आहेत. बऱ्याचदा या क्षेत्राकडे तांत्रिक अभियांत्रिकी (इंजीनियरिंग) म्हणून बघितले जाते. उत्पादकता वाढवण्यासाठी री वर्क कमी करण्यासाठी शक्कल लढवली जाते. लीन सीक्स सिग्मा, जेआयटी, कानबान यांचा समावेश करून उत्पादकता अधोरेखित केली जाते. कृत्रिम प्रज्ञेवर आधारित बरीच एआय टूल्स आता मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये वापरली जाऊ लागली आहेत. ती वापरायला महागडा कंप्यूटर लागतो असं नाही आणि त्यासाठी दरवेळी प्रोग्रामिंग आले पाहिजे, असे देखील नाही. साधा स्मार्टफोन आणि तगडी इच्छाशक्ती ही एवढीच शिदोरी पुरेशी आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील ही एआय प्रेरणा साधने काही प्रमाणात मॅनेजरसाठीची आहेत, तर काही साधने ही चक्क एखाद्या लाईन वर्करसाठी आहेत.
१. Monday.com: असेम्ब्ली लाइनवर ठरलेल्या पद्धतीने प्रक्रिया होते. ऑफिसमध्ये होणारी प्रत्येक क्रिया /काम/ प्रोजेक्ट यांचीही स्टेप बाय स्टेप प्रक्रिया ठरवता येते. या गोष्टी ढोबळमनाने सर्वत्र असतात. त्या व्यवस्थित लेखी स्वरूपात, येणारे अडथळे समजून-उमजून, मांडल्या असतील तर नक्कीच फायदा होतो. monday.com वर जर अशा प्रोसेसची नोंद एकदा केली, तर प्रत्येकाला हे झाल्यावर हे कर मग ते कर अशा प्रकारचे कस्टमायझेशन प्राप्त करता येईल. एखादे काम कुठे अडलंय, त्याबाबत विशिष्ट लोकांना आठवण करून देण्यासारखी ऑटोमेशनची सुरुवातही करता येईल.२. Oddo: एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या संघासाठी आपल्याकडे कुठले रॉ मटेरियल किती संख्येमध्ये उपलब्ध आहे हे माहिती असणे कायम गरजेचे असते. प्रत्येक रॉ मटेरियल ऑर्डर केल्यावर यायला लागणाऱ्या वेळेवर ते किती साठवून ठेवावे, याची आकडेमोड केली जाते. जास्त संख्येने एखादी गोष्ट मागवली तर ती स्वस्त दरात मिळते. परंतु काही गोष्टी फार काळ टिकवून ठेवता येत नाही. oddo प्लॅटफॉर्मवर इन्व्हेंटरी विविध निकषांवर चाळून वर्गवारी केली जाते. एमओक्यू /इओक्यू (मिनिमम ऑर्डर क्वांटिटी) चा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.३. Wipro: सप्लाय चेन हा असाच एक अतिशय महत्त्वाचा विषय. यात मॅन्युफॅक्चरिंग करताना लागणाऱ्या अनेक गोष्टींचा प्रवास कसा कुठून कधी करायचा, याचे नियोजन केले जाते. मागणी व पुरवठा यांची सांगड घातली जाते लॉजिस्टिक विकत घेण्याची प्रक्रिया, पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांपैकी सर्वोत्तम निवडणे (वेंडर मॅनेजमेंट) इत्यादी गोष्टी सांभाळल्या जातात.४. Wrike: कुठल्याही प्रोजेक्टमध्ये काय आणि कुठल्या रिस्क उद्भवू शकतात, याचा अभ्यास जिकीरीचा असतो. छोट्यातल्या छोट्या बाबींचा विचार करून काय चुका होऊ शकतात, कुठल्या प्रकारचे अडथळे निर्माण होऊ शकतात, असा सखोल अभ्यास करावा लागतो. या रिस्क ओळखल्या तरच त्याचे निराकरण होऊ शकते, wrike चा वापर इथे चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो.
कृत्रिम प्रज्ञेवर आधारित बरीच एआय टूल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांत वापरली जात आहेत. त्यासाठी महागडा कॉम्प्युटर लागतो असं नाही. प्रोग्रामिंग आले पाहिजे, असेही नाही. साधा स्मार्टफोन आणि तगडी इच्छाशक्ती ही एवढीच शिदोरी पुरेशी आहे.