‘आर्टीफिशिअल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट राष्ट्राला समर्पित’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:17 AM2018-02-19T01:17:22+5:302018-02-19T03:20:33+5:30

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञान उपयोगी ठरण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

'Artificial Intelligence Institute is dedicated to the nation' | ‘आर्टीफिशिअल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट राष्ट्राला समर्पित’

‘आर्टीफिशिअल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट राष्ट्राला समर्पित’

Next

मुंबई : सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञान उपयोगी ठरण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
पहिल्या आर्टीफिशिअल इंटेलिजन्स इन्स्टिट्युटचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात हा कार्यक्रम झाला. ही संस्था म्हणजे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र एकत्र येऊन कशा प्रकारे काम करते याचे उत्तम उदाहरण आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारे संशोधन हे सामान्यांच्या कल्याणासाठी काम करेल, असे पंतप्रधान म्हणाले.
दिव्यांग ही आपली संपत्ती असून आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यांना अधिक सक्षम कसे करता येईल, या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्य सेवा, कृषीक्षेत्राला भेडसावणाºया समस्या, लहरी हवामानाचा या क्षेत्राला बसणारा फटका त्यावर संशोधन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अटल इनोव्हेशनच्या मिशनच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे इनोव्हेशन हब तयार करण्याचा मानस पंतप्रधानांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ग्रामीण भागात जेथे डॉक्टर आणि विशेषज्ञ उपलब्ध नाहीत तेथे आर्टिफिशिअल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित केलेले यंत्र बसविल्यास त्याचा फायदा सामान्यांना नक्की होईल.

 

मुख्यमंत्र्यांनी मांडली विकासाची पंचसूत्री

मुंबई : आगामी काळात डिजिटल इकॉनॉमीच रोजगार निर्मितीचे प्रमुख साधन असणार आहे. विकासाची संधी असणा-या नव्या क्षेत्रांना खुले करतानाच अकुशल कामगारांचे कौशल्य प्रशिक्षण, विविध उद्योगांसाठी विशेष धोरणे, पायाभूत सोयी सुविधांचा विकास आणि मुंबई महानगर व जेएनपीटीशी संपूर्ण महाराष्ट्राला जोडण्यासाठी समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून २०२५ पर्यंत महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनविणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कनव्हर्जन्स २०१८ या जागतिक गुंतवणुकदारांच्या परिषदेत व्यक्त केला. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर तीन दिवस ही गुंतवणूक परिषद चालणार आहे. 

Web Title: 'Artificial Intelligence Institute is dedicated to the nation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.