Join us

कृत्रिम तलाव ‘नि:शुल्क’; १०१ रुपये का आकारता?; महाराणा प्रताप उद्यानातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 2:05 AM

कांदिवली पूर्व येथील महाराणा प्रताप उद्यानाच्या कृत्रिम तलावामध्ये कांदिवली लोखंडवाला, क्रांतीनगर, दामूनगर, लघुगड, गौतमनगर, लक्ष्मीनगर, भीमनगर, हनुमाननगर, संभाजीनगर, वडारपाडा येथील भाविक विसर्जनासाठी येत आहेत.

मुंबई : कृत्रिम तलावात बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांकडून प्रत्येकी १०१ रुपये आकारण्यात येत असल्याचा आरोप आहे. कांदिवलीच्या महाराणा प्रताप उद्यानात तयार करण्यात आलेल्या तलावात हा प्रकार घडला. नि:शुल्क सेवा असूनही कसले पैसे आकारता? असा सवाल भाविकांनी पालिकेच्या आर दक्षिण विभागाला विचारला आहे.

कांदिवली पूर्व येथील महाराणा प्रताप उद्यानाच्या कृत्रिम तलावामध्ये कांदिवली लोखंडवाला, क्रांतीनगर, दामूनगर, लघुगड, गौतमनगर, लक्ष्मीनगर, भीमनगर, हनुमाननगर, संभाजीनगर, वडारपाडा येथील भाविक विसर्जनासाठी येत आहेत. मात्र प्रत्येक मूर्तीमागे १०१ रुपये काही तरुणांकडून आकारण्यात येत असल्याचे भाविकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुख्य म्हणजे हे पैसे घेतल्यावर ते नेमके कशासाठी आकारले जात आहेत, याबाबत कोणतीही पावती अथवा तत्सम माहिती दिली जात नाही. पालिकेने नि:शुल्क विसर्जन करण्याचे फलकही या ठिकाणी लावले आहेत. पालिकेच्या आर दक्षिणचे सहायक आयुक्त संजय कुºहाडे, नगरसेविका सुरेखा पाटील, तसेच आमदार अतुल भातखळकर यांना संपर्क केला, मात्र तो होऊ शकला नाही.मी पालिकेचा करदाता आहेभाजप आमदार अतुल भातखळकर आणि स्थानिक नगरसेविका सुरेखा पाटील यांच्या नावाचे टीशर्ट घातलेले तरुण पैसे उकळत आहेत. याबाबत मी सहायक पालिका आयुक्त संजय कुºहाडे यांनाही फोन करून ‘मी करदाता असून आपण विसर्जनासाठी पैसे का आकारता,’ असा सवाल केला. तेव्हा पैसे घेऊ नका, असे तलावावरील कर्मचाऱ्यांना बजावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. - आर. धनावडे, भाविक

टॅग्स :गणेशोत्सवभाजपामुंबई महानगरपालिका