मिठी नदीचा पूर रोखण्यासाठी पालिका बांधणार कृत्रिम तलाव; महापालिकेची योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 01:06 AM2019-09-09T01:06:54+5:302019-09-09T06:25:35+5:30
नॅशनल पार्क किंवा आरे कॉलनीची निवड
मुंबई : मुंबईत मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर मिठी नदीला पूर येतो. हा पूर रोखण्यासाठी संजय गांधी नॅशनल पार्क किंवा आरे कॉलनी येथे कृत्रिम तलाव बांधण्याची मुंबई मुंबई महापालिकेची योजना आहे. मिठीनदीमध्ये पवई ,तुलसी आणि विहार तलावातून पाणी येते. ज्यावेळी पाण्याची पातळी वाढते तेव्हा या तलावांमधील पाणी मिठी नदीमध्ये सोडण्यात येते. सर्व पाणी मिठीनदीमध्ये राहणे शक्य नाही. त्यामुळे पूर येतो. हे पाणी साचविण्यासाठी कृत्रिम तलाव बांधल्यास पुराचा प्रश्न निकाली निघेल, असे पालिकेचे मत आहे.
मुंबईत १ ते ४ सप्टेंबर दरम्यान ४०० मिमी पाऊस झाला. हा पाऊस सप्टेंबर महिन्यातील सरासरी पावसापेक्षा जास्त होता. ४ सप्टेंबर रोजी सकाळी मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली. दुपारी १ वाजता नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे कुला ,सायन ,माटुंगा आणि बीकेसी परिसरात पूर आला. काही रहिवाशांच्या घरामध्ये पाणी घुसले , यंत्रणांनी कुर्ला येथील क्रांतीनगरमध्ये अडकलेल्या १५०० लोकांची सुटका केली होती. त्यामुळे कुत्रिम तलाव बांधण्याची योजना आखण्यात आली.