Join us

Balasaheb Thackeray Birth Anniversary : अनोखी मानवंदना; 33 हजार रुद्राक्षांच्या माध्यमातून साकारले बाळासाहेब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 8:40 AM

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोरच शिवसेनाप्रमुखांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे

ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये शिवसेनाप्रमुखांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे.चेतन राऊत या कलाकाराने 33 हजार रुद्राक्षांनी बाळासाहेबांची प्रतिमा साकारत अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन केले.33 हजार रुद्राक्षांचा वापर करुन 8 बाय 8 फूट या आकारातील ही प्रतिमा साकारण्यात आली.

मुंबई - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्येशिवसेना भवनासमोरच शिवसेनाप्रमुखांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. चेतन राऊत या कलाकाराने 33 हजार रुद्राक्षांनी बाळासाहेबांची प्रतिमा साकारत अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन केले आहे. 

बाळासाहेब ठाकरेंचं रुद्राक्षांसोबत वेगळंच नातं होतं. त्यामुळेच त्यांची प्रतिमा रुद्राक्षांनी साकारल्याची माहिती प्रतिमा साकारणारा कलाकार चेतन राऊतने दिली. तब्बल 33 हजार रुद्राक्षांचा वापर करुन  8 बाय  8 फूट या आकारातील ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. तसेच या माध्यमातून जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्नही केल्याचेही राऊतने सांगितले. 

भव्य चित्रातून बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील नारायण पेठेमध्येही त्यांचे भव्य चित्र साकारण्यात आले आहे. युवासेनेचे शहराध्यक्ष निरंजन दाभेकर यांच्या कल्पनेतून हे चित्र साकारण्यात आले आहे. प्रसिद्ध कलाकार निलेश खराटे यांनी हे चित्र साकारले असून सध्या हे चित्र पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेला आदर आणि प्रेम यातून दाभेकर यांनी इमारतीच्या भिंतीवर बाळासाहेबांचे चित्र साकारण्याचा निर्णय घेतला.  नारायण पेठेतील एका इमारतीच्या भिंतीवर 60 बाय 30 इतक्या आकाराचे हे चित्र असून भारतात पहिल्यांदाच बाळासाहेबांचे इतके भव्य चित्र साकारण्यात येत असल्याचा दावा दाभेकर यांनी केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादरमधील महापौर बंगल्यात स्मारक उभारण्यासाठी 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला आहे. स्मारक उभारणीसाठी मुंबई पालिकेकडून स्मारक संस्थेला महापौर बंगल्याची जागा भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. त्याची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी बाळासाहेबांच्या जयंती दिनी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करतील.

 

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेनापुणेमुंबई