मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे व्यावसायिक क्षेत्रांप्रमाणे कला क्षेत्राचेही नुकसान झाले. उदरनिर्वाहासाठी आपल्या कलेवर अवलंबून असणाऱ्या चित्र, शिल्प कलाकारांसह मॉडेल म्हणून काम करणाºया सर्व घटकांचे नुकसान झाले. या कलाकारांना पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद देण्यासाठी सामग्रीसह आर्थिक मदतीसाठी द आर्ट सोसायटी आॅफ इंडिया संस्थेने पुढाकार घेतला आहे. कला क्षेत्रात तब्बल १०२ वर्षे जुनी असणारी ही कलाकारांद्वारे कलाकारांच्या हितांसाठी स्थापित केलेली संस्था आहे. ही संस्था कलाकारांसाठी अनेक कार्यक्रम तसेच सहकार्य राबवत असते.गरजू कलाकारांना गेल्या पाच महिन्यांपासून उपजीविकेसाठी मिळकतीचे बहुतांश सर्वच मार्ग बंद असल्यामुळे आर्थिक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. अशा चित्र-शिल्प कलाकारांना फूल ना फुलाची पाकळीची माणुसकीच्या नात्याने मदत करणार आहेत, मदत थेट गरजूंच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सर्वात आधी ज्येष्ठ कलाकार वासुदेव कामत यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. आता या मदतीला व्यापक स्वरूप देण्यात येत आहे.द आर्ट सोसायटी आॅफ इंडियाकडून प्रतिष्ठित, सशक्त इच्छुक व्यक्तींना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे. याविषयी, संस्थेचे सचिव विक्रांत शितोळे यांनी सांगितले, आजच्या घडीला ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत, महंतांच्या उक्तीनुसार गरजूंना संकटकाळात मदतनिधीचा हातभार लावून माणुसकीचे दर्शन द्यावे, ही विनंती आहे. याकरिता, संस्थेच्या बँक खात्यावर मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा निधी पाठवताना आपल्या देय वर्णनात ‘Artist Relief Fund’ असे नमूद करावे. कृपया तुमच्या व्यवहाराची पावती, संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक, पत्ता आणि ईमेल आयडी theartsocietyofindia@gmail.com वर ईमेल करावे. मदतीची मुदत ३१ आॅगस्ट २०२० पूर्वी आपली देणगी पाठवावी.
>Bank :- TJSB (Thane Janata Sahakari Bank)Account Name:- The Art Society of IndiaAccount No:- 078110100002416IFSC: TJSB0000078MICR: 400109036