पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक : गुन्हे शाखेने ठोकल्या बेडया
पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक : गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालिका, चित्रपटांमधील शूटिंग उरकल्यानंतर परिसरातील महिलांना पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या कलाकराला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सलमान उर्फ जाकिर उर्फ कलाकार फिरोज जाफरी (४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
वृद्ध महिलेची फसवणूक करून ५ लाख किमतीच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी देहरादून पटेलनगर पोलिसांनी ३ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान संशयित आरोपी ओशिवरा परिसरात असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या मदतीने ओशिवरा येथील जय अंबे सोसायटीतून आरोपीला अटक करण्यात आली.
जाफरी हा टीव्ही कलाकार असून तो ‘चितोडगड की राजकुमारी पद्मिनी’, ‘छत्रपती राजा शिवाजी’, ‘सावधान इंडिया’ तसेच गुलमकई बहनचोर या सिनेमांमध्ये सहकलाकार म्हणून काम करतो.
शूटिंगदरम्यान मुंबईवरून विमान प्रवास करून देहरादून, चंदीगड व उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून विमानमार्गे मुंबईला परत येत असल्याचे सांगितले.
नागपूरमध्ये ३ आणि उत्तराखंडमध्ये २ गुन्हे केल्याचे चौकशीत समोर आले आहे. आरोपीला देहरादून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.