Join us  

मुंबई आर्ट फेस्टीव्हलच्या गीतामध्ये धारावीतील कलाकार सामील !

By स्नेहा मोरे | Published: January 04, 2024 7:20 PM

राज्याच्या पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टीव्हल समितीच्या वतीने नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई आर्ट फेस्टीव्हल आयोजित केला आहे.

मुंबई- राज्याच्या पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टीव्हल समितीच्या वतीने नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई आर्ट फेस्टीव्हल आयोजित केला आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या फेस्टीव्हलच्या गीताचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या गीताचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, यात द धारावी ड्रीम प्रोजेक्टमधील कलाकारांचा सहभाग आहे. आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या या वस्तीतील कलाकारांचा ' मुंबई एक त्योहार है... ' या गाण्यातील सहभाग हे सांस्कृतिक वैविध्यतची समरसता असल्याचे उदाहरण आहे.

मुंबईच्या विविध कोपऱ्यांत २० ते २८ जानेवारीदरम्यान मुंबई आर्ट फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आले. त्या पार्श्वभूमीवर अनावरण करण्यात आलेल्या या फेस्टीव्हलच्या गीत निर्मितीत संगीतकार शमीर टंडन, गायक शंकर महादेवन, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोझा, गायिका फाल्गुनी पाठक, गायिका हर्षदीप कौर आणि गायक - संगीतकार अवधूत गुप्ते यांनीही मोलाचे योगदान दिले आहे. शहर उपनगरात होणाऱ्या फेस्टीव्हलच्या पार्श्वभूमीवर हे गीत मुंबईकरांच्या मनात जागा तयार करण्यासाठी सज्ज झाले आहे

विविध वाद्ये आणि सुरांच्या सिम्फनीद्वारे, विविधतेतील शहराच्या एकतेचा गौरव करणारा संगीतमय कॅनव्हास रंगवला. नाशिक ढोलचे गुंजणारे ताल, गरब्याच्या उत्साही ताल आणि बले बल्लेचे विजयी प्रतिध्वनी हे मुंबईच्या फॅब्रिकमध्ये अखंडपणे विणलेले मराठी, गुजराती आणि पंजाबी संस्कृतींचे सार या गीतातून प्रतित होते, अशी माहिती गीताच्या निर्मितीत प्रक्रियेतील कलाकारांनी दिली आहे.

गीतनिर्मितीत सहभाग आनंददायी डॉली, कलाकार, द धारावी ड्रीम प्रोजेक्ट

आशियातील दुसरी-सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावीत कलेचा खजिनाही आहे. शहराच्या झोपडपट्टीच्या वस्तीत, गल्ल्यांमधल्या वस्तीत राहून मुंबईच्या आत्म्याशी झालेले आमचे नाते कलेतून प्रतिबिंबित होते. या प्रोजेक्टच्या माध्यमातून येथील वस्तीतील तरुणांना कलेचे बाळकडू देऊन भविष्यातील स्वप्न, ध्येयांचा कॅनव्हास मोठा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या फेस्टीव्हलच्या गीतामधील सहभाग आनंद देणार आहे.