कलेने माणसं जोडणे कलाकारांचं काम - किरण राव

By admin | Published: October 17, 2016 05:03 PM2016-10-17T17:03:34+5:302016-10-17T17:11:56+5:30

सिनेनिर्माती किरण राव यांनी 'कलाक्षेत्रातील लोकांनी पूल बांधून, माणसांना जवळ आणण्याचे काम केले पाहिजे', अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Artist's work involving artworks - Kiran Rao | कलेने माणसं जोडणे कलाकारांचं काम - किरण राव

कलेने माणसं जोडणे कलाकारांचं काम - किरण राव

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - भारत आणि पाकिस्तानातील वाढलेल्या तणावामुळे भारतात पाकिस्तानी कलाकार आणि त्यांच्या सिनेमांवर बंदी घालण्यात आली आहे. यावर सिनेनिर्माती किरण राव यांनी 'कलाक्षेत्रातील लोकांनी आपल्या कलेने पूल बांधून माणसांना जवळ आणण्याचे काम केले पाहिजे', अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई एकॅडमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाकिस्तानी सिनेमा 'जागो हुआ सवेरा' चे स्क्रीनिंग करण्याला विरोध होत आहे. यावर किरण राव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. किरण राव मुंबई एकॅडमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या (मामी) अध्यक्षा आहेत. किरण रावला पाकिस्तानी सिनेमांविरोधातील समस्या सुटेल अशी असताना ‘जागो हुआ सवेरा’चं स्क्रीनिंग रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
आणखी बातम्या

'ए दिल...' प्रदर्शित करू नका - मनसेची मल्टिप्लेक्स मालकांना तंबी

कलाकारांनाच का केलं जातं टार्गेट? - प्रियंका चोप्रा

पाक कलाकारांचा एकही सिनेमा दाखवणार नाही, सिनेमा ओनर्स असोसिएशनचा निर्णय

'सध्याची वेळ संघर्षमय असल्याने सर्वजण भावनिक झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोणत्याही देशाच्या कलाकाराने आपल्या कलेने माणसं जोडणे, एक कलाकाराच्या नात्याने सामंजस्य निर्माण करणे, हे त्याचे काम आहे, असेही किरण रावने म्हटले आहे. दरम्यान, 20 ऑक्टोबरपासून मामी फेस्टिव्हलला सुरुवात होत आहे. 54 देशातील 180 सिनेमे फेस्टिव्हलमध्ये दाखवले जाणार आहेत.

 

Web Title: Artist's work involving artworks - Kiran Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.