Join us

'जगण्यावर शतदा प्रेम' करायला शिकवणाऱ्या अरुण दाते यांची अजरामर गाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2018 10:45 AM

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांनी आज ईहलोकीचा निरोप घेतला असला, तरी त्यांनी गायलेली एकाहून एक सरस गाणी मराठी रसिकांच्या मनात कायमच रुंजी घालत राहणार आहेत.

मुंबईः मराठी संगीतप्रेमींना ज्यांनी भावगीतांच्या मंद, धुंद, हळूवार तालावर झोपाळ्यावाचून झुलायला शिकवलं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, म्हणत आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं, ते ज्येष्ठ गायक अरुण दाते यांनी आज ईहलोकीचा निरोप घेतला आहे. पण, त्यांनी गायलेली एकाहून एक सरस गाणी मराठी रसिकांच्या मनात कायमच रुंजी घालत राहणार आहेत. दाते काकांच्या सुरेल स्वरांमुळे अजरामर झालेली अशीच काही गाणी....  

शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनीआज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पाहातू अशी जवळी रहा...

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, म्हणत आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे 

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी ।अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी ।।

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला ।गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला ।।

दिवस तुझे हे फुलायचेझोपाळ्यावाचून झुलायचे स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणेगाण्यात हृदय झुरायचे झोपाळ्यावाचून झुलायचे...

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले...

दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहेमनांतल्या मोरपिसाची, शपथ तुला आहे

हात तुझा हातातून धुंद ही हवारोजचाच चंद्र आज भासतो नवारोजचेच हे वारे, रोजचेच तारेभासते परी नविन विश्व आज सारे ही किमया स्पर्शाची, भारीते जीवाहात तुझा हातातून धुंद ही हवा....

अखेरचे येतील माझ्या, हेच शब्द ओठीलाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती 

टॅग्स :arun date