ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे

By admin | Published: December 31, 2016 02:51 AM2016-12-31T02:51:02+5:302016-12-31T02:51:02+5:30

ग्रंथालय संचालनालयांतर्गत ग्रंथ निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. ग्रंथ निवड समितीची नियुक्ती शासनाने केली आहे. या समितीमार्फत सार्वजनिक ग्रंथालयांना

Aruna Dhere, Chairman of the Selection Selection Committee | ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे

ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे

Next

मुंबई : ग्रंथालय संचालनालयांतर्गत ग्रंथ निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. ग्रंथ निवड समितीची नियुक्ती शासनाने केली आहे. या समितीमार्फत सार्वजनिक ग्रंथालयांना उपयुक्त निवडक पुस्तकांची शिफारस केली जाते.
२२ सप्टेंबर २०११ रोजी नियुक्ती करण्यात आलेल्या ग्रंथनिवड समितीची मुदत संपुष्टात आल्याने नव्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे असणार आहेत. तर साहित्य संस्थांमधून शिफारस करण्यात आलेल्या प्रतिनिधींमध्ये शशिकांत सावंत (मुंबई), डॉ. रामचंद्र देखणे (पिंपरी-चिंचवड) आणि श्रीपाद प्रभाकर जोशी (चंद्रपूर) यांचा समावेश आहे. तर शासकीय सदस्यांमध्ये आनंद हर्डीकर (पुणे), प्रा. सुभाष आठवले (ठाणे) आणि सुरेश जंपनगिरे (परभणी) यांचा समावेश होता. याशिवाय, यात राज्य ग्रंथालय संघाच्या विभागवार प्रतिनिधींचा समावेश असेल. आणि शासकीय सदस्यांत संचालक, उच्च शिक्षण यांचे प्रतिनिधी, ग्रंथालय संचालक यांचा समावेश असणार आहे. या ग्रंथ निवड समितीच्या दरवर्षी किमान दोन बैठका अध्यक्षांच्या अनुमतीने होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Aruna Dhere, Chairman of the Selection Selection Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.