मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शपथविधी होत आहे. मंगळवारी सुमारे ५ तास आणि बुधवारी सुमारे चार तास मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात केंद्रातील मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. गुरुवारी पंतप्रधानांसह महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईल. यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत गुरुवारी मोदी यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.अरविंद सावंत यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद देवरा यांना दक्षिण मुंबईतून दोनदा पराभूत केले आहे. अभ्यासू खासदार म्हणून संसदेत छाप पाडण्यात सावंत गेल्या टर्ममध्ये यशस्वी ठरले. विशेष म्हणजे ते मातोश्रीच्या जवळचे समजले जातात. राज्यसभेचे उपसभापती म्हणून शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची वर्णी लागू शकते. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, एक उपसभापती व एक राज्यपालपद अशी मागणी मोदी व शाह यांच्याकडे केल्याचे समजते. जूनच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला अजून एक कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यास जेष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.दरम्यान, उद्धव ठाकरे, आदित्य आणि रश्मी ठाकरे, मिलींद नार्वेकर हे शपथविधी सोहळ््यात सहभागी होण्यासाठी बुधवारी रात्री उशीरा दिल्लीत पोहोचले.>विनायक राऊतयांनाही संधी?शिवसेनेच्या वाटेला येणाºया दोन राज्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतील एकमेव महिला खासदार भावना गवळी (यवतमाळ), बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांची नावे आघाडीवर आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता व कोकणात शिवसेना मजबूत करून नारायण राणे यांना शह देण्यासाठी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचीही राज्यमंत्री म्हणून वर्णी लागू शकते.
अरविंद सावंत कॅबिनेट मंत्री?, संजय राऊत उपसभापती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 6:06 AM