Aryan Khan Case: मुंबई NCB चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढत आहेत. सीबीआयने उद्या त्यांना चौकशीसाठी बोलावले असताना आता मॉडेल मुनमुन धामेचाने (Munmun Dhamecha) वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी तिला आर्यन खानप्रकरणात गोवण्यात आल्याचे धमेचाने म्हटले आहे.
मुनमुन धामेचाच्या म्हणण्यानुसार, समीर वानखेडेचा उद्देश फक्त मीडियाचे लक्ष वेधून घेण्याचा होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धमेचाने सांगितले की, समीर वानखेडे हे पॉवरफूल अधिकारी आहेत, त्यामुळे आधी त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत झाली नाही. आता त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने हे बोलण्याची हिंमत आली आहे.
फक्त प्रसिद्धीसाठी केलेआर्यन खानसोबत क्रूझ पार्टीत ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली मॉडेल मुनमुन धामेचाला अटक करण्यात आली होती. मुनमुन धमेचाने म्हटले की, वानखेडे सातत्याने मॉडेल आणि सेलिब्रिटींना टार्गेट करत होते. यातून प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा हेतू होता. त्यामुळेच तिला खोट्या आरोपात अडकवण्यात आले. मुनमुनच्या या आरोपानंतर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढणार आहेत.
'काहींना ड्रग्ज असूनही सोडले'मुनमुन धामेचाच्या म्हणण्यानुसार, ती प्रसिद्ध मॉडेल नव्हती, तिला क्रूझ पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. तिला क्रूझमध्ये एक खोली देण्यात आली. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यावेळी खोलीत इतरही लोक होते, मात्र अधिकारी व्हीव्ही सिंग यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. ज्यांना सोडले, त्यांच्याकडे ड्रग्ज सापडले होते. दरम्यान, मुनमुन धमेचावर 5 ग्रॅम चरस खरेदी केल्याचा आरोप आहे.