Aryan Khan Drug Case: नवा गौप्यस्फोट! भाजपा नेत्याचं 'स्टिंग ऑपरेशन', प्रभाकर साईलनं पैशांसाठी केले वानखेडेंवर खोटे आरोप?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 11:09 AM2021-10-26T11:09:31+5:302021-10-26T11:10:18+5:30
Aryan Khan Drug Case: भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक नवा व्हिडिओ ट्विट करत आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे.
मुंबई-
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक नवा व्हिडिओ ट्विट करत आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. रामजी गुप्ता नावाच्या व्यक्तीचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं असून यात प्रभाकर साईल यानं किरण गोसावीकडे पैशांची मागणी केली होती आणि त्यानं ते दिले नाहीत म्हणूनच प्रभाकर साईल आता आरोप करतोय, असं रामजी गुप्ता नावाचा व्यक्ती बोलत या व्हिडिओत बोलत असल्याचं मोहित कंबोज यांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणामागे मियाँ नवाब आणि मनोज यांचा हात असल्याचंही यात स्पष्टपणे ऐकू येत आहे.
मोहित कंबोज यांच्या दाव्यानुसार राजमी गुप्ता नावाच एक नोटरी करणारा व्यक्तीचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. यात रामजी गुप्ता स्पष्टपणे म्हणतोय की, किरण गोसावीकडून प्रभाकर साईल यानं पैशांची मागणी केली होती. कारण प्रभाकर हा किरण गोसावी याचा बॉडीगार्ड होता. त्याला सोबत घेऊनच सारंकाही झालं होतं, असं या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. दरम्यान, या स्टिंग ऑपरेशनची सत्यता 'लोकमत'नं पडताळून पाहिलेली नाही. पण या स्टिंग ऑपरेशनमुळे प्रभाकर साईलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पाहा स्टिंग ऑपरेशन-
String Operation of Notary Ram Ji Gupta :
— Mohit Bharatiya ( Mohit Kamboj ) (@mohitbharatiya_) October 26, 2021
Ram ji says #PrabhakarSail Has Done All This For Money From Kiran Gosavi !
Clearly saying मियाँ Nawab and Manoj is Behind This !#AryanKhanhttps://t.co/XyzphQE2Xbpic.twitter.com/FMGYvquQ2r
दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनीही आज 'स्पेशल-२६' नावानं नवा गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडेंच्या कारवायांबाबत एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला आहे.
नवाब मलिक यांनी यासंदर्भात एक ट्विट करत हे पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात ते म्हणतात की, एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर येथे आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती केली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
एनसीबीमध्ये काही बोगस अधिकाऱ्यांची टोळी तयार झाली आहे. ही टोळी लोकांना ड्रग्सच्या केसमध्ये फसवते. अशा २६ केसचा या पत्रामध्ये उल्लेख आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर दिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याच्या दाव्याचा नवाब मलिक यांनी पुनरुच्चार केला आहे. एका गरजू मागासवर्गीत उमेदवाराचा नोकरीचा हक्क समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवून हिरावल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच यासंदर्भात जातवैधता समितीकडे तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.