मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे कुटुंब सध्या प्रचंड तणावाखाली आहे. कारण, 'मन्नत'चा राजकुमार सध्या तुरुंगात आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणात अडकल्याने जवळपास गेल्या 17-18 दिवसांपासून कारागृहात आहे. तो कारागृहात अस्वस्थ असल्याचेही बोलले जात आहे. गुरुवारी सकाळी शाहरुख खानने आर्थर रोड कारागृहात जाऊन त्याची भेट घेतली. तर, आर्यन खानसोबत बराक 1 मध्ये असलेल्या कैद्याने आर्यनची परिस्थिती कथन केली आहे.
शाहरुख आणि गौरी खान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने आर्यनशी संवाद साधला होता. महाराष्ट्रात कोरोना प्रोटोकॉलमुळे, कैदी कुटुंबीयांना समोरासमोर भेटू शकत नव्हते. परंतु 21 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी या गाइडलाईनमध्ये सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे, शाहरुख खानने आज तुरुंगात जाऊन आर्यन खानची भेट घेतली. शारुखनने आर्यनची भेट घेण्यापूर्वी आर्यनसोबत तुरुंगात असलेल्या एका कैद्याने आर्यनचा निरोप घेऊन शाहरुखचा मन्नत बंगला गाठला होता. मात्र, शाहरुख खानच्या कुटुंबीयांनी त्यास दाद दिली नाही. त्यामुळे तो वापस फिरल्याचे त्याने सांगितले. श्रणन नागराज असं या कैद्याचं नाव असून ते आर्यनसोबत आर्थर रोड तुरुंगात होते.
आर्यन खानला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच ट्रीट केलं, व्हीआयपी ट्रीटमेंट अजिबात दिली नाही. कैद्यांसोबतच त्यालाही जेवण मिळतं, त्याकडे पैसे नसल्याने कँटीनमधून काही खरेदी करण्यासाठी इतर कैदी त्याला मदत करायचे. काही कैद्यांनी बिस्कीटं खायला दिली. आर्यनने माझ्याजवळ निरोप दिला होता की, घरी जाऊन मला पैसे मनीऑर्डर करायला सांगा. मी त्यासाठी आर्यनच्या घरी गेलो होतो, पण मला तिथं काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं नागराज यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं.
कारागृहात कैत्यांना कसे भेटता येणार?
आता, कुटुंबातील सदस्य, नातलग आणि वकील आर्थर रोड कारागृहात जाऊन कैद्यांना भेटू शकतात. नातलग/वकील यांना भेटण्यासाठी आधी तुरुंग अधिकाऱ्यांना कळवावे लागेल. यानंतर, तुरुंग अधिकारी भेटण्याची वेळ देतील. कारागृहातील कैद्याला भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला आपले आधार कार्ड तुरुंग अधिकाऱ्याकडे जमा करावे लागेल. तपशील नोंदविला जाईल. नातेवाईक/वकील यांना टोकन दिले जाईल. कैद्याला भेटण्यापूर्वी टोकन दाखवावे लागेल. या सर्व प्रक्रियेनंतर कैद्याला भेटता येईल.
आपल्या मुलाला कसा भेटला शाहरुख खान?
तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला भेटण्यासाठी शाहरुख खानला विशेष ट्रिटमेंट दिली गेली नाही. भेटीच्या वेळी आर्यन खान आणि शाहरुख यांच्यामध्ये एक ग्रिल आणि काचेची भिंत होती. असे कोरोनामुळे करण्यात आले होते. शाहरुख आणि आर्यन हे इंटरकॉमवर बोलले. यावेळी 2 रक्षकही तेथेच उपस्थित होते.
वडिलांना पाहून आर्यनच्या डोळ्यात पाणी
आपल्या वडिलांना खूप दिवसांनंतर बघून आर्यन खानच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो अत्यंत भाऊक झाला होता. शाहरुख खानसाठीही आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहणे सोपे नव्हते. 15 मिनिटांच्या या वेळेत शाहरुखही अत्यंत भाऊक झालेला होता. यावेळी, आपल्याला तुरुंगातील अन्न पसंत नाही, असे आर्यन खानने वडिलांना, म्हणजेच शाहरुख खानला सांगितले. शाहरुखही यावेळी अत्यंत चिंतीत दिसत होता. घरचे अन्न देण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे तुरुंगाधिकाऱ्यांनी शाहरुखला सांगितले आहे.