Join us

Aryan Khan Drugs Case : 25 कोटींच्या डीलचा आरोप, नवाब मलिक यांची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 3:49 PM

मी सुरुवातीपासूनच सांगत होतो, या प्रकरणात एक अधिकारी. सगळी यंत्रणा चुकीची आहे, असं मी म्हणत नाही. पण, ज्यादिवशीपासून समीर वानखेडे या विभागात आले, तेव्हापासून त्यांनी खोट्या केसेस बनवायला सुरुवात केली.

ठळक मुद्देमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलंय. तसेच, आता, हा विषय पुढे आला असून गोसावीच्या माध्यमातून ही पैसे वसुली सुरू झालेली आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यनला NCB ने मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात(Mumbai Cruise Drugs Rave Party) अटक केली आहे. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा सहकारी प्रभाकर साईल या घटनेला वेगळचं वळण दिलं आहे. NCB नं धमकावून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. किरण गोसावी गायब झाल्यापासून आपल्या जीवाला समीर वानखेडेंकडून धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर, आता राष्ट्रवादीचे नेते आणि सातत्याने याप्रकरणी भाष्य करणारे मंत्री नवाब मलिक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

मी सुरुवातीपासूनच सांगत होतो, या प्रकरणात एक अधिकारी. सगळी यंत्रणा चुकीची आहे, असं मी म्हणत नाही. पण, ज्यादिवशीपासून समीर वानखेडे या विभागात आले, तेव्हापासून त्यांनी खोट्या केसेस बनवायला सुरुवात केली. फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करुन प्रसिद्धी मिळवायची, दहशत निर्माण करायची आणि मोठं वसुली रॅकेट या माध्यमातून निर्माण करायचं सुरू झाल्याचं आम्ही अगोदरपासूनच सांगत होतो, असे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलंय. तसेच, आता, हा विषय पुढे आला असून गोसावीच्या माध्यमातून ही पैसे वसुली सुरू झालेली आहे. आता, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, यासंदर्भात एक एसआयटी नेमून चौकशी सुरू केली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. 

25 कोटींच्या डीलचा संवाद

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर हा किरण गोसावीचा(Kiran Gosavi) बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारीपूर्वी गोसावीला कोऱ्या कागदावर सही करण्यासाठी मजबूर केले. क्रुझवर ड्रग्ज मिळाले की नाही याबाबत कल्पना नाही. परंतु या कोऱ्या कागदाचा वापर आर्यन प्रकरणात वापरण्यात आला. किरण गोसावी कुणासोबत तरी फोनवर बोलत होता. ज्यात २५ कोटींचा बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख होता. ही डील १८ कोटींमध्ये सेटल होणार होती. ज्यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना मिळणार होते. 

कारवाईमागे मोठे षड्यंत्र

या संवादात शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानीकडून पैसे घेण्याचा उल्लेख होता. पूजा फोन उचलत नव्हती असंही संवादात म्हटलं गेले. तर मुंबई क्रुझवर धाड टाकण्यापूर्वी किरण गोसावीला NCB कार्यालयाबाहेर सॅम डिसुझा नावाचा व्यक्ती भेटला होता. छापेमारीवेळी सावधतेने काही व्हिडीओ आणि फोटो घेतले गेले. एका व्हिडीओत स्पष्टपणे दिसत होतं की, गोसावीने ताब्यात घेण्यापूर्वी आर्यन खान कुणाशी तरी फोनवरुन संवाद साधत होता. या कारवाईमागे मोठं षडयंत्र असल्याचा संशय प्रभाकर साईलनं व्यक्त केला आहे.

NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

आर्यन खान प्रकरणात NCB ने किरण गोसावीला साक्षीदार बनण्यासाठी दबाव टाकला होता. साक्षीदाराला छापेमारीची माहिती कशी मिळू शकते. पंचनामा कारवाई आधीच केला होता. लोकांकडून सह्या घेतल्या होत्या. या कारवाईमागे तो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत गोसावीने आर्यनशी फोनवरुन बोलणं करुन दिलं होतं. या संवादानंतर आर्यनला ताब्यात घेण्यात आलं. प्रभाकरने सॅम नावाच्या व्यक्तीचा शोध घेण्याचं आवाहन केले आहे. ज्याला छापेमारीपूर्वी किरण गोसावी NCB कार्यालयाबाहेर भेटला होता. एनसीबीच्या क्रूझवरील कारवाईवेळी  एनसीबीचे अधिकारी, मी, किरण गोसावी आणि मनिष भानुशाली इतकेच उपस्थित होतो, अन्य कोणीही पंच उपस्थित नव्हते. माझ्या जीवाला धोका असल्याने सोलापूरला जाऊन राहिलो होतो. पंच असूनही आता कुटूंबीयांना धोका असल्याने  सर्व सत्य सांगत आहेत असं प्रभाकर साईलनं कबुली दिली. 

टॅग्स :समीर वानखेडेनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनवाब मलिकआर्यन खान