Aryan Khan Drugs Case : अधिवेशनात भाजपचे पितळ उघडे करणार, या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणेही मुश्कील होईल - नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 06:45 AM2021-10-30T06:45:50+5:302021-10-30T06:46:41+5:30

Nawab Malik : मी एका दाढीवाल्याचे नाव घेतले होते. या दाढीवाल्याचे नाव काशिफ खान आहे. तो त्या पार्टीत होता. फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही? अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होणार आहे, असेही मलिक म्हणाले. 

Aryan Khan Drugs Case : BJP to open brass in winter session: Nawab Malik | Aryan Khan Drugs Case : अधिवेशनात भाजपचे पितळ उघडे करणार, या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणेही मुश्कील होईल - नवाब मलिक

Aryan Khan Drugs Case : अधिवेशनात भाजपचे पितळ उघडे करणार, या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणेही मुश्कील होईल - नवाब मलिक

Next

मुंबई : भाजपचे नेते आणि त्यांचे ‘राईट हँड’ हे कालपासून समीर वानखेडेंना भेटत आहेत. मी येत्या हिवाळी अधिवेशनात या नेत्यांची नावे जाहीर करणार आहे. त्यावेळी या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणेही मुश्कील होईल, असा दावा अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी केला. 

मी एका दाढीवाल्याचे नाव घेतले होते. या दाढीवाल्याचे नाव काशिफ खान आहे. तो त्या पार्टीत होता. फॅशन टीव्हीशी संबंधित आहे. त्याला अटक का करण्यात आली नाही? अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होणार आहे, असेही मलिक म्हणाले. 

‘योगी महाराज’ नोएडामध्ये एक फिल्मसिटी तयार करत आहेत. ते मागे ताजमहल हॉटेलमध्ये काही लोकांना भेटले. बॉलिवूडला बदनाम करून ते उत्तर प्रदेशात नेऊन यूपीवूड करण्याचे प्रयत्न होत आहेत पण तसा प्रयत्न केला तर ती तुमची घोडचूक ठरेल, तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असा इशारा दिला.

महाराष्ट्राचे सरकार आणि महाराष्ट्रातील लोकांना, मुंबईला बॉलिवूडला बदनाम केले जात आहे. ‘योगी महाराज’ नोएडामध्ये एक फिल्मसिटी तयार करत आहेत. ते मागे ताजमहल हॉटेलमध्ये काही लोकांना भेटले. भाजपचे समर्थक कलाकार त्यांना भेटले. बॉलिवूडला बदनाम केल्याने बॉलिवूड मुंबईच्या बाहेर जाईल.    - नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री

पोपटाला तेवढेच काम 
मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात भाजपवर केलेल्या आरोपांवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मलिक हे दिवसभर काही तरी बोलत असतात. त्यांना सध्या दुसरे काहीच काम नाही. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यात अर्थ नाही. राष्ट्रवादीचा ‘पोपट’ दररोज बोलतोय, त्यामुळे आम्ही बोललो पाहिजेच, असे नाही, या शब्दांत त्यांनी चिमटा काढला.

Web Title: Aryan Khan Drugs Case : BJP to open brass in winter session: Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.