Join us

Aryan Khan Drugs : 'अचानक 22 दिवसांनी प्रभाकरची भाषा कशी बदलली, सीडीआर तपासावा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 6:51 PM

Aryan Khan Drugs : समीर वानखेडे यांनी आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर करण्यात आला

ठळक मुद्देअचानक 22 दिवसांनी प्रभाकरची भाषा कशी बदलली. गेल्या 22 दिवसांत तो कोणाच्या संपर्कात होता. कोणत्या मंत्र्यांचा त्याच्यावर दबाव होता का, कोणत्या मंत्र्यांच्या तो संपर्कात होता हे पाहयाल हवं.

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याप्रकरणात असल्याने देशभरा हे प्रकरण गाजत आहे. त्यातच, दररोज नवनवीन खुलासे किंवा आरोप-प्रत्यारोप यातून समोर येत आहेत. त्यामुळे, याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून प्रभाकर साहिलने समीर वानखेडेंवर खंडणीचा आरोप केला आहे. त्यावरुन, भाजप आमदार राम कदम यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तसेच, समीर वानखेडेंच्या चौकशीही मागणी केलीय.  

समीर वानखेडे यांनी आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर करण्यात आला. क्रुझ पार्टी प्रकरणी पंच असणारे प्रभाकर साईल यांनी हे आरोप केले आहेत. दरम्यान, समीर वानखेडेंकडून या सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलंय. सध्या प्रकरणावर काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. याप्रकरणी आमदार राम कदम यांनी प्रभाकर साहिलच्या अचानक समोर येण्यावरुन प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

अचानक 22 दिवसांनी प्रभाकरची भाषा कशी बदलली. गेल्या 22 दिवसांत तो कोणाच्या संपर्कात होता. कोणत्या मंत्र्यांचा त्याच्यावर दबाव होता का, कोणत्या मंत्र्यांच्या तो संपर्कात होता हे पाहयाल हवं. त्यासाठी, त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स, रेकॉर्डींग तपासावे, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. अप्रत्यक्षपणे ड्रग्ज माफियांचं समर्थन का होत आहे, पहाडासारखं त्यांच्या पाठिशी का उभं राहतोय, काही हफ्तावसुली तेथेही होतेय का, या सगळ्या गोष्टींमागचं सत्य जनतेमसोर येईल. महाराष्ट्र सरकारने हे विसरू नये, सत्यमेव जयते... असे म्हणत राम कदम यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय.  

टॅग्स :राम कदमआर्यन खानअमली पदार्थसमीर वानखेडे