आर्यन खानच्या वकिलांची आता थेट PM मोदींना साद; म्हणाले, "आता रिया ड्रग्ज प्रकरणातही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 08:58 PM2022-05-28T20:58:42+5:302022-05-28T20:59:16+5:30

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) या ड्रग्ज प्रकरणात क्लीनचीट मिळाली आणि 'किंग खान'ला मोठा दिलासा मिळाला.

aryan khan lawyer satish maneshinde demands similar inquiry rhea chakraborty drugs case | आर्यन खानच्या वकिलांची आता थेट PM मोदींना साद; म्हणाले, "आता रिया ड्रग्ज प्रकरणातही..."

आर्यन खानच्या वकिलांची आता थेट PM मोदींना साद; म्हणाले, "आता रिया ड्रग्ज प्रकरणातही..."

googlenewsNext

नवी दिल्ली-

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) या ड्रग्ज प्रकरणात क्लीनचीट मिळाली आणि 'किंग खान'ला मोठा दिलासा मिळाला. आर्यन खानला दिलासा मिळाल्यानंतर आता त्याचे वकील सतिश मानेशिंदे यांनी रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणातही अशाच पद्धतीनं चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. रिया आणि शोविककडेही ड्रग्ज सापडले नव्हते. तसंच त्याची कोणतीही चाचणी देखील झाली नव्हती. 

"आर्यन प्रकरणातील राजकीय बाजूवर मला कोणतंही विधान करायचं नाही आणि नवाब मलिक यांनी काय म्हटलंय यावरही मला काही बोलायचं नाही. मी एक वकील आहे. याप्रकरणात तीन-चार असे अधिकारी होते की ज्यांनी जी कारवाई केली ती योग्य नव्हती. किंवा तशा कारवाईची गरज देखील नव्हती. त्यांनी असं का केलं ते माहित नाही. पण शाहरुख खानच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी खूप अडचणींचा सामना केला आहे", असं आर्यन खानचे वकील सतिश मानेशिंदे म्हणाले.

"माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावं. सर्व गोष्टींचा खोलात जाऊन विचार केला गेला पाहिजे. हा केंद्र किंवा राज्य सरकार असा मुद्दा नाही. गेल्या तीन वर्षांत एनसीबीच्या काही लोकांनी अनेक व्यक्तींना त्रास दिला आहे. या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. आता आर्यन खानविरोधातील केस कशी खोटी होती हे सिद्ध झालं आहे आणि हे सर्व रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणापासून सुरू आहे", असंही ते म्हणाले. 

बॉलीवूड कलाकारांचं आयुष्य फक्त १० ते २० वर्ष!
"माझी विनंती आहे की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी असं खोट्या केसेस दाखल करण्याचं काम केलं आहे त्यांच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे. बॉलीवूड कलाकारांचं आयुष्य अवघ १० ते २० वर्षच असतं. त्यांना फीट राहावं लागतं. त्यामुळे ड्रग्ज सेवनाचा प्रश्नच निर्माण होत नाही. अधिकाऱ्यांनी केवळ लोकप्रियतेसाठी कलाकारांविरोधात अशी कारवाई केली आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात कारवाईची गरज आहे", असं सतीश मानेशिंदे म्हणाले. 

Web Title: aryan khan lawyer satish maneshinde demands similar inquiry rhea chakraborty drugs case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.