Join us  

आर्यनच्या अटकेनंतरचे फुटेज उंदराने कुरतडले; एनसीबी अधिकाऱ्याने आरोपीचे घड्याळ चोरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 5:35 AM

वानखेडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर एनसीबीने त्यांची दिल्ली येथील कार्यालयामध्ये विभागीय चौकशी केली. चौकशीच्या अहवालात हे फुटेज गहाळ झाल्याच्या मुद्दयावर बोट ठेवण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॉर्डिलिया क्रूझवरील छाप्यानंतर अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अटक केल्यानंतर एनसीबी कार्यालयात आणले, त्यावेळेचे एनसीबी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज खराब झाल्याची माहिती पुढे आली आहे. वानखेडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर एनसीबीने त्यांची दिल्ली येथील कार्यालयामध्ये विभागीय चौकशी केली. चौकशीच्या अहवालात हे फुटेज गहाळ झाल्याच्या मुद्दयावर बोट ठेवण्यात आले आहे.आरोपीचे घड्याळ चोरले

आर्यनच्या सोबत अन्य ९ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी नूपुर सतिजा या मुलीलादेखील अटक करण्यात आली होती. तिच्या चौकशीदरम्यान या प्रकरणातील चौकशी अधिकारी लढ याने तिच्या हातातील अॅपल कंपनीचे घड्याळ काढून घेतले. या घड्याळाची कोणतीही कागदोपत्री नोंद केली नाही.

वानखेडे यांची पाच तास सीबीआय चौकशीकॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीमध्ये अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपप्रकरणी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची शनिवारी सीबीआयच्या अधिकायांनी मुंबईतील बीकेसी येथील कार्यालयात पाच तास चौकशी केली. वानखेडे सकाळी १०:३० वाजता सीबीआय कार्यालयात हजर झाले होते.

ठपका : यामागे नक्की काहीतरी दडलेले आहे....१ उपलब्ध माहितीनुसार ३ ऑक्टोबरच्या पहाटे ज्यावेळी या प्रकरणातील पंच किरण गोसावी हा आर्यन खानला घेऊन एनसीबीच्या कार्यालयात आला, त्यानंतर पंचनामा आदी कामे तेथे केली जात होती.याच दरम्यान गोसावी याने आर्यनसोबत सेल्फी काढला होता. २५ कोटींची लाच मागितल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर वानखेडे व त्यांच्या पथकाला दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.3 या चौकशीदरम्यान आर्यनला अटक केलेल्या वेळेच्या सीसीटीव्ही फुटेजबद्दल विचारणा केली. मात्र, त्या फुटेजऐवजी वानखेडे व त्यांच्या अधिकायांनी दुसरेच फुटेज व डीव्हीआर सादर केला.४ आर्यन जिथे होते तिथले फुटेज नेमके उपलब्ध नाही, त्यामुळे यामागे नक्की काहीतरी दडलेले आहे, असा थेट ठपका एनसीबीने आपल्या अहवालात ठेवला आहे. 

टॅग्स :समीर वानखेडेआर्यन खानगुन्हा अन्वेषण विभागनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो