आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया; तानाजी सावंत यांची माहिती

By संतोष आंधळे | Published: August 28, 2023 06:37 PM2023-08-28T18:37:35+5:302023-08-28T19:02:23+5:30

तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रियेला आला वेग

As many as 10 thousand 949 posts recruitment process will be done in health department; Information from Tanaji Sawant | आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया; तानाजी सावंत यांची माहिती

आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया; तानाजी सावंत यांची माहिती

googlenewsNext

मुंबई: गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती यामध्ये केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी दिली. 

तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती. आता पुन्हा एकदा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 

आता होणाऱ्या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून एकूण १० हजार ९४९ पदांची केली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मार्फत राबवली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली आहे.

Web Title: As many as 10 thousand 949 posts recruitment process will be done in health department; Information from Tanaji Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.