राज्यातील तब्बल २२ शहरे प्रदूषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 06:22 IST2024-12-28T06:21:41+5:302024-12-28T06:22:46+5:30
सात शहरांमधील हवा अतिशय वाईट असून ही हवा आरोग्यास अपायकारक

राज्यातील तब्बल २२ शहरे प्रदूषित
बाळासाहेब बोचरे
मुंबई : गेले काही दिवस राज्यातील हवा बिघडली असून २२ शहरे सध्या प्रदुषणाचा सामना करत आहेत. सात शहरांमधील हवा अतिशय वाईट असून ही हवा आरोग्यास अपायकारक आहे.
राज्यातील सर्वाधिक प्रदूषित हवा ही भिवंडीची असून, शुक्रवारी या शहराचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक २५५ इतका होता. त्याखालोखाल भायंदर (२४०), उल्हासनगर (२३८), कल्याण (२३२), नांदेड (२२३), उरण (२१९) आणि पुणे (२०४) या शहरांतही प्रदूषणाची मोठी समस्या आहे. या शहरांतील हवा आरोग्यास घातक मानली जात आहे.
गेल्यावर्षी बोरिवली, मालाड, विलेपार्ले परिसरातील हवा सातत्याने अतिवाईट ते वाईट श्रेणीत नोंदली जात होती. यामध्ये बोरिवली परिसरातील हवा निर्देशांक अनेकदा २५०-३२० दरम्यान होती. त्यानंतर विलेपार्ले येथेही २००-३५०, मालाड २००-२५० आणि गोवंडी येथे निर्देशांक २५०-३०० नोंदला गेला होता. ज्या भागांमध्ये हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीची आहे तिथे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकत्रित मोहीम राबवावी, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
इतर प्रदूषित शहरे
चिंचवड १९०
ठाणे १६४
मुंबई १६३
मालेगाव १५८
खेड १५३
जुन्नर १५१
धुळे १४८
नाशिक १४५
अहिल्यानगर १४३
कोल्हापूर १४०
भुसावळ १३१
जळगाव १२७