राज्यात साडेतीन कोटींची तब्बल 383 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 04:26 PM2023-04-28T16:26:53+5:302023-04-28T16:27:05+5:30

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये 24 ते 26 एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली.

As many as 383 cases of electricity theft worth three and a half crores were revealed in the state | राज्यात साडेतीन कोटींची तब्बल 383 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस

राज्यात साडेतीन कोटींची तब्बल 383 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस

googlenewsNext

मुंबई : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिम राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल 383 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये 24 ते 26 एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमे दरम्यान एकुण 383 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आलेली आहेत या तीन दिवसांमध्ये नागपूर परिक्षेत्रांतर्गत सर्वाधिक 121,  कोकण परिक्षेत्रात 117, औरंगाबाद परिक्षेत्रात 92 तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत 53 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. या वीजचोरी प्रकरणांमध्ये मोठया प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. या वीजचो-या प्रकरणी अंदाजे 3 कोटी 50 लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला असून पुढील कार्यवाही चालू आहे.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात ही मोहिम सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (प्रभारी) मुंबई सुमित कुमार, यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याने ग्राहकांनी वीजचोरी न करता वीजेचा अधिकृत वापर करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

Web Title: As many as 383 cases of electricity theft worth three and a half crores were revealed in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज