Join us  

संजय पांडेंना अटक होताच भाजपा नेते मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 9:49 PM

Sanjay Pandey Arrest: संजय पांडे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपा नेते Mohit Kamboj यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. दरम्यान, संजय पांडे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.Mission Completed today, म्हणजेच माझी मोहीम आज पूर्ण झाली असं कंबोज यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच याआधी केलेली अनेक ट्विट मोहित कंबोज यांनी रिट्विट केली आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मोहित कंबोज यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ही कारवाई सुडबुद्धीने झाली, असा आरोप कंबोज यांनी केला होता. तसेच त्यांनी संजय पांडे यांना थेट आव्हान दिले होते. त्याबरोबरच पुढच्या काळात एका मोठ्या आयपीएस अधिकाऱ्याचं पितळ उघडं पडेल असा दावा केला होता.

तसेच पांडेजी कुठल्या पक्षात प्रवेश करणार, असं ट्विट मोहित कंबोज यांनी २६ एप्रिल रोजी केले होते. तसेच संजय पांडे यांना अटक झाल्यानंतर एक संजय तुरुंगात गेला, दुसरा लवकरच, असं सूचक ट्विट मोहित कंबोज यांना आता केला आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १४ जुलैला अटक केली होती. त्यानंतर आता संजय पांडे यांना अटक केल्याने खळबळ माजली आहे.

नुकत्याच नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांना मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या  iSEC या कंपनीचा शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे इंटरसेप्ट करण्यासाठी समावेश करण्यात आला होता. एफआयआरमध्ये असेही आरोप करण्यात आले होते की, संजय पांडे यांच्या कंपनीला स्टॉक एक्स्चेंज कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याबद्दल 4.45 कोटी रुपये देण्यात आले होते.

टॅग्स :भाजपाअंमलबजावणी संचालनालय