Join us

मंत्र्यांनी आदेश देताच मिळाली आरेमधील सार्वजनिक शौचालय नूतनीकरणाला एनओसी

By मनोहर कुंभेजकर | Published: June 02, 2023 4:40 PM

चित्रनगरी प्रशासनाकडे पाठपुरावा केला परंतू ते परवानागी देण्यास टाळाटाळ करत होते.

मुंबई - सरकारी काम आणि सहा महिने थांब याची प्रचिती आरेतील चित्रनगरीत दिसून आली.सार्वजनिक शौचालय नूतनीकरणाला टाळाटाळ करणाऱ्या चित्रनगरी प्रशासनाने मंत्र्यांनी आदेश देताच अखेर आरे मधील सार्वजनिक शौचालय नूतनीकरणाला एनओसी मिळाली,

प्रभाग क्र 52 मधील आरे कॉलनी यूनिट 7 सुनील मैदान येथील सार्वजनिक शौचालय मोडकळीस आल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे त्यांची पुनर्बांधणी गरजेची असून माजी नगरसेविका प्रिती सातम यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करत होत्या. त्यानुसार सदर शौचालय नूतनीकरणासाठी तोडून नवीन बांधण्याचे काम महापालिकेने सुरू देखिल केले होते. परंतु त्यात  चित्रनगरी प्रशासनाने हरकत घेऊन काम थांबवले होते.

चित्रनगरी प्रशासनाकडे पाठपुरावा केला परंतू ते परवानागी देण्यास टाळाटाळ करत होते. अखेर नागरिकांची होणारी गैरसोय व तोंडावर आलेला पावसाळा यामुळे तातडीने ना हरकत दाखला मिळवा म्हणुन थेट राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सदर विषयाची दखल घ्यावी अशी विनंती केली आणि मंत्री महोदयांनी तातडीने संबधितांना निर्देश दिले.अखेर चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी आज महापालिकेला शौचालय पुनर्बांधणी साठी लेखी परवानगी दिली अशी माहिती प्रीती सातम यांनी लोकमतला दिली.

चित्रनगरी प्रशासनाकडून महापालिकेला ना हरकत दाखला मिळाला आणि आता येथील शौचालयाची पुनर्बांधणी होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करत  सातम यांचे आभार मानले.

टॅग्स :मुंबई