मुंबई-
बोरिवली पश्चिम येथील शिंपोली, शिवाजीनगर येथील झोपडपट्टीतील शौचालय पुनर्बांधणीची परवानगी नाकारणाऱ्या आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या निर्णया विरोधात येथील मोठ्या संख्येने झोपडपट्टीवासीयांनी काल आंदोलन केले. विशेष म्हणजे शौचालय पुनर्निर्माणची अधिकृत वर्क ऑर्डर असतांना पालिका प्रशासनाने काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या आंदोलनात रस्त्यावर उतरून उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी देखिल सहभागी झाले.आणि विशेष म्हणजे त्यांच्या आंदोलनाची दखल घेत आधी शौचालय पुनर्बांधणीला नकार देणाऱ्या आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी सदर पुनर्बांधणीला आज पासून परवानगी देत असल्याचे पत्र काल रात्री उशिरा आपल्याला दिले अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,येथील दोनशे नागरिकांना दैंनदिन प्रभावित करणाऱ्या आवश्यक अश्या शौचालयाचा. अनेक वर्षा पूर्वी निर्माण केलेले शिवाजीनगर येथील चौदा आसनी शौचालय चार वर्ष पूर्वी तत्कालीन आमदार विनोद तावडे यांनी पुन्हा दुरुस्त करून बांधले होते. महाराष्ट्र सरकारच्या सर्व सार्वजनिक शौचालय पुनर्निर्माण म्हाडा मार्फत पुनर्बांधणी करण्याच्या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी ठरविले आणि निधी ही मंजूर करण्यात आला. एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण पणे तोडून नवीन शौचालय उभारणीचे काम देखिल सुरू ही झाले. यासाठी .२० लाख रुपयांचीची निविदा काढण्यात आली होती. आणि त्यात २० टक्के कपात होऊन मनपाने निविदा मंजूर करून कॉन्ट्रॅक्टरला वर्क ओर्डर देण्यात आली. त्यानुसार ६० दिवसात सदर काम पूर्ण करायचे होते. परंतू काही स्थानिक व्यक्तींच्या दबावाखाली येऊन शेकडो नागरिकांच्या जीवनावश्यक सुविधेचे काम बंद करण्यात आले.
नागरिकांच्या अडचणीवर लक्ष न देता सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी शौचालयाचे काम थांबविले. त्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले होते.वारंवार मनपा कार्यालयात चकरा मारत होते. मुखमंत्री नाले सफाई बघण्या साठी दि,20 मे रोजी जेव्हा बोरीवलीत आले तेव्हा ही शेकडो महिलांनी त्यांच्या समोर येवून हा विषय मांडला होता.परंतू सहाय्यक आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष करत आपली मनमानी चालू ठेवली असा आरोप स्थानिकांनी केला.
काल पूर्ण दिवसाच्या धरणे आंदोलना नंतर उशिरा मनपा आर/मध्य विभागातून त्यांनी जनते करिता न्याय मिळवला. पालिकेच्या लेखित आदेशानुसार सहाय्यक आयुक्तांनी आज दि,६ जून पासून या शौचालयाचे पुनर्निर्माण पूर्वीच्याच जागेवर सुरू करण्यात येत असल्याचे खा.गोपाळ शेट्टी यांना पत्र दिले.आणि अखेर न्याय मिळाल्याने स्थानिकांनी त्यांचे आभार मानले.