पावसाने उघडीप देताच, खड्डे बुजविण्यासाठी लगीनघाई; खड्यांवरून MMRDAवर टीकेचे आसूड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 02:12 PM2023-08-05T14:12:42+5:302023-08-05T14:13:03+5:30

मुंबई एमएमआरडीएने २,७८३ खड्यांपैकी २,३७८ खड्डे भरले आहेत.

As soon as the rain gave way, there was a rush to fill the potholes; Criticism of MMRDA from the hills | पावसाने उघडीप देताच, खड्डे बुजविण्यासाठी लगीनघाई; खड्यांवरून MMRDAवर टीकेचे आसूड

पावसाने उघडीप देताच, खड्डे बुजविण्यासाठी लगीनघाई; खड्यांवरून MMRDAवर टीकेचे आसूड

googlenewsNext

मुंबई एमएमआरडीएने २,७८३ खड्यांपैकी २,३७८ खड्डे भरले आहेत. त्यामध्ये १,४६७ खड्डे हे रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ११२ किमी लांबीच्या भागातील असून, त्यापैकी १,३७३ खड्डे भरण्यात आले आहेत. मेट्रोच्या प्रकल्पांच्या अखत्यारित येणाऱ्या १०० किमी रस्त्यांवरील १,३१६ खड्ड्यांपैकी हजार ५ खड्डे बुजविण्यात आले आहेत. रस्ते प्रकल्पांतर्गत ९४ आणि मेट्रो प्रकल्पांतर्गत उर्वरित ३११ खड्डे येत्या ४८ तासांत भरण्यात येणार आहेत.

आसपासच्या परिसरात पडलेल्या खड्ड्यांतून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर टीकेचे आसूड ओढण्यात आले होते. पॉटहोल्स वॉरियर्सकडून प्राधिकरणाचा समाचार घेतला जात असतानाच पाच दिवसांपूर्वी आमदार आदित्य ठाकरे यांनीही प्राधिकरणावर खड्ड्यांसह खराब रस्ते प्रकरणी तोफ डागली होती. 

आदित्य यांनी प्राधिकरणाला धारेवर धरले असतानाच आता बहुतांश ठिकाणांवरील खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

कंत्राटदारांकडून दुरुस्ती
■ काही रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यावर ते इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना हस्तांतरित केल्यानंतरही कंत्राटदारांकडून डिफेक्ट लायबिलिटी पीरियड अंतर्गत रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते.
वांद्रे-कुर्ला संकुल, ओशिवरा आणि वडाळा ट्रक टर्मिनल येथील अंदाजे २८ किमी काँक्रिट रस्त्यांच्या देखभालीसाठी कंत्राटदार नेमले आहेत.

रस्ते बांधण्याची जबाबदारी आणि प्रकल्प
>> मुंबई ट्रान्स हार्बर लिंक
>> शिवडी वरळी कनेक्टर
>> ऐरोली कटाई नाका प्रकल्प
>> छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्प 
>> एससीएलआर विस्तार

कोण भरते खड्डे?
एमएमआरडीएमार्फत प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पालगत असणाऱ्या सर्व रस्त्यावरील खड्डे प्रतिसाद पथकाद्वारे त्वरित भरले जात आहेत.

हवामान खाते काय म्हणते?
■ मान्सूनमध्ये सरासरी २,३१८८० मिमीची नोंद • जुलै महिन्यात १७६९.८ मिमीची नोंद

Web Title: As soon as the rain gave way, there was a rush to fill the potholes; Criticism of MMRDA from the hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई