कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्यातून वाहने सुसाट, वरळीपर्यंतचा प्रवास आता अवघ्या नऊ मिनिटांत पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 10:41 AM2024-06-11T10:41:42+5:302024-06-11T10:51:45+5:30

Mumbai News: कोस्टल रोड प्रकल्पाचा मरिन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतचा ६.२५ किमीचा दुसरा बोगदाही सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वरळीपर्यंतच्या ४० मिनिटांच्या प्रवासासाठी आता अवघी आठ ते नऊ मिनिटे लागतील. 

As vehicles pass through the second tunnel of the Coastal Road, the journey to Worli is now completed in just nine minutes. | कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्यातून वाहने सुसाट, वरळीपर्यंतचा प्रवास आता अवघ्या नऊ मिनिटांत पूर्ण

कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्यातून वाहने सुसाट, वरळीपर्यंतचा प्रवास आता अवघ्या नऊ मिनिटांत पूर्ण

 मुंबई - कोस्टल रोड प्रकल्पाचा मरिन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतचा ६.२५ किमीचा दुसरा बोगदाही सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वरळीपर्यंतच्या ४० मिनिटांच्या प्रवासासाठी आता अवघी आठ ते नऊ मिनिटे लागतील. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. या मार्गासाठी २.७२ किमीचे दोन महाकाय बोगदे जमिनीपासून ७० मीटरवर खोदण्यात आले आहेत. सोमवारी  मरिन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतचा ६.२५ किमीचा मार्ग सुरू करण्यात आला.

१०.५८ किमीचा कोस्टल रोड आणि ४.५ किमीचा वांद्रे वरळी सी लिंक यांना जोडणारे दोन्ही महाकाय गर्डर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच वांद्रे ते दक्षिण मुंबई हा पाऊण तासाचा प्रवास अवघ्या १२ मिनिटांत करता येईल. आता प्रामुख्याने मरिन ड्राइव्ह ते हाजी अली या उत्तर दिशेकडील प्रवासासाठी ६.२५  किमीचा मार्ग खुला करण्यात आला आहे. या मार्गावरील प्रवासात अमरसन्स उद्यान आणि हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा   वापर करता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल. 

तूर्त आठवड्यातून पाच दिवसच वाहतूक 
तूर्त ही मार्गिका  सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवसच सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत वापरता येईल. उर्वरित वेळेत शिल्लक १० टक्के काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.   
शिंदेंचा नियंत्रण कक्षाशी संपर्क 
मरिन ड्राइव्ह येथून सुरू होणाऱ्या बोगद्यात वाहनधारकांसाठी बसविण्यात आलेल्या आपत्कालीन दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला.
व्हिन्टेज कारमधून पाहणी 
आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, तसेच सकार्डो प्रणाली, बोगद्यातील प्रकाशव्यवस्था आदींची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी बोगद्याची पाहणी व्हिन्टेज कारमधून केली.

Web Title: As vehicles pass through the second tunnel of the Coastal Road, the journey to Worli is now completed in just nine minutes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.