लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): राज्यात सोमवारी कोरोनाच्या एकूण २८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील १३ रुग्ण हे मुंबईतील आहेत. त्यामुळे राज्यात १६८ आणि मुंबईत ७७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. साेमवारी १३ जण बरे होऊन घरी गेले. मुंबईत जे १३ रुग्ण आढळले आहेत त्यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल केले आहे. दिवसभरात ५२ चाचण्या करण्यात आल्या.
सध्या राज्यात जे एन. वनचे एकूण १० रुग्ण आहेत. ठाणे मनपा - ५, पुणे, मनपा -२, पुणे ग्रामीण -१, अकोला मनपा -१ आणि सिंधुदुर्ग - १ त्यापैकी ८ पुरुष आणि १ महिला रुग्ण आहे. नऊ रुग्णांपैकी १ रुग्ण नऊ वर्षांचा आहे, एक रुग्ण २१ वर्षांची महिला आणि एक रुग्ण २८ वर्षांचा पुरुष आहे.
नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही
नवीन जे एन. वन व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. सर्दी, खोकल्याप्रमाणे हा व्हेरियंट आहे. यामुळे कुठलाही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा काळात सतर्क राहिले पाहिजे, मात्र उगाचच या गोष्टीचा बाऊ करता कामा नये. - डॉ. शशांक जोशी, माजी सदस्य, कोरोना टास्क फोर्स