Join us

...आता 'आशा' फक्त मनसेकडून! विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचं अमित ठाकरेंना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 6:28 PM

आशा कर्मचाऱ्यांनी मनसे नेते अमित ठाकरेंची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले

मुंबई - सार्वजनिक आरोग्य खात्याच्या 'राष्ट्रीय आरोग्य अभियाना'अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकूण ७२,००० आशा स्वयंसेविका (Accredited Social Health Activist) व सुमारे ३५०० गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या 'आशां'नी करोना संकटकाळात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावूनही त्यांना अत्यंत तुटपुंजे (रु. १६००- रु. २५००) मानधन दिले जाते त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी मनसे नेते अमित ठाकरेंकडे धाव घेतली आहे.

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 'आशा' गेली पाच वर्षं राज्य सरकारशी पाठपुरावा करत आहेत. पण त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. म्हणूनच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन 'आशा'च्या शिष्टमंडळाने आपल्या समस्या मांडल्या आणि "आता मनसेच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते" अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज येरुणकर, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपविभागअध्यक्ष विनायक राऊत उपस्थित होते.

टॅग्स :मनसेराज्य सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस