Keshav Upadhye On CM Uddhav Thackeray: आषाढी वारीच्या निमित्तानं एकादशीच्या महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढपूरकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही आहेत. तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसमधून वाखरी इथं दाखल झाल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदाही केवळ मोजक्याच पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ( Ashadhi Wari 2021 BJP chief spokesperson Keshav Upadhye criticizes CM Uddhav Thackeray)
केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करुन यात मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. "जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्यांचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री...", अशा ओळींमधून उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे पत्न रश्मी ठाकरे यांच्यासह स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. पावसाचा जोर असतानाही मुख्यमंत्री स्वत: ड्राइव्ह करत पंढरपुरच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. यावेळी नेहमीची मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे निघाले आहेत.