मुंबई-महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या नावाने वांद्रे पश्चिम येथे सुंदर उद्यान तयार करण्यात आला असून त्यांच्या हस्ते या लोकार्पण करण्यात आले. माझ्या साठी मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुंदर रंगबिरंगी झाडे, दिव्यांची रोशणाई, एक छोटे स्टेज, साऊंडची सुविधा, बैठक व्यवस्था सोबत आशाताईंंचे गाण्याचे स्वर तसेच गौतम राजाध्यक्षांनी काढलेली त्यांची प्रसन्न भावमुद्रेतील छायाचित्रे अशा प्रकारे या उद्यानाची रचना करण्यात आली आहे. एमएसआरडीसी कार्यालया समोरील जागेत हे उद्यान मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अँड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे. हे उद्यान सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. शिवाय येथे आशाताईंची गाणी ही रोज ऐकता येणार आहेत. अशा प्रकारचे हे उद्यान पहिलेच ठरावे असे सांगतानाच आमदार अँड आशिष शेलार यांनी ही संकल्पना कशी सुचली हे विषद केले.
या लोकार्पण सोहळ्यात आशा भोसले भारावून गेल्या. म्हणाल्या की मला खूप पुरस्कार मिळाले, तसेच सगळ्यांचे खूप प्रेम लाभले पण माझ्या नावाचे उद्यान तयार करुन आशिष शेलार यांनी मला सुखद धक्काच दिला. मला हा मिळालेला. मला मिळालेल्या सर्वच पुरस्कारा पेक्षा हा मोठा पुरस्कार आहे. ही बाग मला खूप आवडली, मी आता माझ्या मित्र परिवाराला सांगेन की नक्की एकदा या सुंदर बागेला भेट द्या. मी देवाचे खूप खूप आभार नेहमीच मानते परमेश्वाने मला भरभरून दिले त्या पैकी मला मिळालेले हे परमेश्वराचे सुंदरच देणेच आहे, अशा भावना व्यक्त करीत त्यांनी शेलार यांचे आभार मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.