मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून आशिष शेलारांचा 'ठाकरे' सरकारला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 12:07 PM2020-06-10T12:07:48+5:302020-06-10T12:13:00+5:30

मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला चिमटा काढला आहे.

Ashish Shelar comment on Uddhav Thackeray government cabinet meeting | मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून आशिष शेलारांचा 'ठाकरे' सरकारला चिमटा

मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून आशिष शेलारांचा 'ठाकरे' सरकारला चिमटा

Next
ठळक मुद्देमी या विभागाचा मंत्री आहे की नाही? ते आधी/स्पष्ट करा मग हा प्रस्ताव मांडा, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला. त्यानंतर सर्वच मंत्र्यानी आक्षेप घेतले.

मुंबई : मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या विभागाचा एक प्रस्ताव त्यांना माहिती नसताना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला. त्यावरून मंत्रिमंडळात प्रचंड खडाजंगी झाली आणि शेवटी तो प्रस्ताव मागे घेण्यात आला.

दरम्यान, या मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला चिमटा काढला आहे. आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "महत्त्वाचा नाही, इथं शेतकऱ्यांचा सोनेरी गहू
मंत्री मोठा की, सचिव मोठा ते ठरवा आधी राऊ
शेतकऱ्याचा गहु पावसात भिजेल.. भिजला तर भिजू द
मीच भुज"बळ"...मंत्री मंडळात माझा रुबाब मात्र टिकू दे
भाजीसह आंबा,कापूस, तूर, केळी उध्वस्त संत्री
महाराष्ट्रात प्रोटोकॉलसाठी भांडतात बघा कसे मंत्री! "

दरम्यान, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी हंगामाचा गहू किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना न सांगतात थेट मंत्रिमंडळ बैठकीत मांडला गेला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्याचे काम मंत्र्यांनी करायचे असते. पण हा प्रस्ताव थेट सचिवांनी मांडायला सुरुवात केली. तेव्हा छगन भुजबळ यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला.

मी या विभागाचा मंत्री आहे की नाही? ते आधी/स्पष्ट करा मग हा प्रस्ताव मांडा, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला. त्यानंतर सर्वच मंत्र्यानी आक्षेप घेतले. मंत्र्यांना अंधारात ठेवून प्रस्ताव आणण्याची हिंमत होते कशी असा सवाल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. तर माजी मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळात कोणते प्रस्ताव आणायचे हे नोकरशाही ठरवणार का? असा सवाल केला.

सचिवांना कदाचित माहिती नसेल त्यामुळे असा प्रस्ताव आला असेल, अशी सारवासारव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र त्यावरही अनेक मंत्र्यांनी आक्षेप घेतले. जर मंत्रिमंडळ बैठकीचे संकेत, नियम पाळायचे नसतील तर ते न पाळणार्‍या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, असाही सूर अनेक मंत्र्यांनी लावला. 

आजवर कोणत्याही मंत्रिमंडळ बैठकीत असे कधीही घडले नव्हते. मंत्र्यांना डावलून प्रस्ताव आणण्याची पद्धत अत्यंत आक्षेपार्ह आहे असे सांगत शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्ताव परत द्या अशी सूचना केली. त्यानंतर प्रस्ताव मागे घेण्यात आला.
 

आणखी बातम्या...

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाने घेतला आमदाराचा बळी, वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू

CoronaVirus in Thane नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन

चिनी सैन्याची माघार, पण जिनपिंग यांचा स्टार कमांडर सीमेवर तैनात

Jammu and Kashmir : सुरक्षा दलांना मोठं यश, शोपियान जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Web Title: Ashish Shelar comment on Uddhav Thackeray government cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.