Join us

राज्यात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप! नाना पटोले तातडीने दिल्लीला जाणार, वरिष्ठांशी चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 1:17 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवत अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवत अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्या या राजीनाम्यामुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

अशोक चव्हाण हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत मराठवाड्यातील काँग्रेसचे काही आमदारही राजीनामा देतील, अशीही माहिती समोर येत आहे. याचदरम्यान नाना पटोले तातडीने दिल्लीसाठी रवाना होत आहेत. दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचं समजतेय.

अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात मंत्रीपद देण्यासाठी भाजपा नेत्यांकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे त्यांना राज्यसभा दिली जाण्याची दाट शक्यता आहे. अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सातत्याने सुरु होती. पण अशोक चव्हाण यांनी त्याचे खंडन केले होते. पण आज सकाळपासून मी त्यांना फोन करत आहे. पण त्यांचे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांचे फोन बंद आहेत.

दरम्यान, अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय, असं देवेंद्र फडणवीस सांगितलं. तसेच 'आगे देखो होता है क्या', असं सूचक विधानही देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलं. 

टॅग्स :अशोक चव्हाणनाना पटोलेकाँग्रेसमहाराष्ट्रभाजपा