Join us

नरेंद्र मोदींच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा २७ ला मुंबईत मोर्चा - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 5:53 AM

राफेल लढाऊ विमान खेरदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब केले असल्याचा आरोप करीत

मुंबई  - राफेल लढाऊ विमान खेरदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब केले असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी शनिवारी पत्र परिषदेत केली. या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने २७ सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.राफेल घोटाळ््याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करावी, अशी मागणी करुन चव्हाण यांनी टीका केली की, मोदींना देशहितापेक्षा त्यांच्या उद्योगपती मित्रांचा फायदा महत्त्वाचा आहे. मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठीच देश चालवत आहेत, हे पुन्हा एकदा राफेल घोटाळ्यावरून सिद्ध झाले आहे.देशाच्या सैनिकांची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल डील बदलले.सेवाग्राममध्ये काँग्रेस कार्यकारिणी बैठककाँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक गांधी जयंतीला २ आॅक्टोबर रोजी सेवाग्राम (जि.वर्धा) येथे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे. त्याच दिवशी काँग्रेसच्या वतीने सेवाग्राममध्ये झेंडा मार्चदेखील काढण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. केंद्रातील भाजपा सरकारविरुद्ध या बैठकीच्या निमित्ताने राहुल गांधी रणशिंग फुंकणार आहेत.

टॅग्स :नरेंद्र मोदीअशोक चव्हाण