मुंबई : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांना सादर केला आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे मी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पाठविला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतर्गत फेरबदलाचा निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचा आहे. यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच आहेत, असे चव्हाण यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितले. काँग्रेसचा पराभव झालेल्या राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे सादर करत पक्षांतर्गत फेरबदलास वाट मोकळी करण्याची भूमिकाही चव्हाण यांनी मांडली होती.मागील निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात नांदेड आणि हिंगोली या दोन जागांवर विजय मिळाला होता. यंदा मात्र काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झालेल्या सुरेश धानोरकर हे राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. चंद्रपुरात त्यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला.>राहुल गांधी यांची भेट घेणारसोमवारी ते राजधानी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेणार असून महाराष्ट्रातील निकाल आणि राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 6:26 AM