मुंबई : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला देण्यात आलेले ‘राष्ट्रपती पदक’ परत घेण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच हे प्रकरण वरिष्ठांकडून दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला का हे तपासले जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.२४ जानेवारी २०१७ रोजी या प्रकरणात अटकेत असलेला कुरुंदकरवर गुन्हा दाखल होण्यापूर्वी राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते. याबाबत अधिक माहिती देताना गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले की, ३१ जानेवारी २०१७ला कुरुंदकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र त्याला एक वर्षानंतर ७ डिसेंबर २०१७ रोजी अटक करण्यात आली. तर त्यानंतर आठ दिवसांनी त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले.या हत्येची उकल घटनेच्या बऱ्याच कालावधीनंतर लागण्यामागे वरिष्ठांचा हात असल्याची शंका पावसकर यांनी उपस्थित केली.
अश्विनी बेद्रे हत्या प्रकरण : कुरुंदकरचे राष्ट्रपती पदक परत घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 4:41 AM