असीमकुमार गुप्ता यांची ‘मदत-पुनर्वसन’मध्ये बदली; ४ IAS अधिकाऱ्यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:07 AM2021-01-30T05:07:59+5:302021-01-30T05:08:07+5:30
विजय सिंघल हे राज्य वीज वितरण कंपनीचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील.
मुंबई : राज्य शासनाने शुक्रवारी चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांना मदत व पुनर्वसन विभागात त्याच पदावर पाठविण्यात आले. राज्य वीज पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे हे आता ऊर्जा विभागाचे (उद्योग, ऊर्जा व कामगार) नवे प्रधान सचिव असतील. विजय सिंघल हे राज्य वीज वितरण कंपनीचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील.
असीमकुमार गुप्ता - सध्या प्रधान सचिव; ऊर्जा बदली - प्रधान सचिव; मदत व पुनर्वसन
दिनेश वाघमारे - सध्या अध्यक्ष व प्रधान सचिव; (उद्योग, व्यवस्थापकीय ऊर्जा व कामगार) बदली - संचालक; महापारेषण
विजय सिंघल -नियुक्तीच्या प्रतीक्षेत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक; वीज वितरण
किशोरराजे निंबाळकर सध्या सचिव; मदत व पुनर्वसन बदली सदस्य सचिव; महाराष्ट्र जीवन प्राधिकरण