Join us

असीमकुमार गुप्ता यांची ‘मदत-पुनर्वसन’मध्ये बदली; ४ IAS अधिकाऱ्यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 5:07 AM

विजय सिंघल हे राज्य वीज वितरण कंपनीचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील. 

मुंबई : राज्य शासनाने शुक्रवारी चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांना मदत व पुनर्वसन विभागात त्याच पदावर पाठविण्यात आले. राज्य वीज पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे हे आता ऊर्जा विभागाचे (उद्योग, ऊर्जा व कामगार) नवे प्रधान सचिव असतील. विजय सिंघल हे राज्य वीज वितरण कंपनीचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील. 

असीमकुमार गुप्ता  - सध्या प्रधान सचिव; ऊर्जा  बदली -  प्रधान सचिव; मदत  व पुनर्वसनदिनेश वाघमारे   - सध्या अध्यक्ष व प्रधान सचिव;  (उद्योग, व्यवस्थापकीय ऊर्जा व कामगार) बदली - संचालक; महापारेषणविजय सिंघल  -नियुक्तीच्या प्रतीक्षेत  अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक; वीज वितरणकिशोरराजे निंबाळकर   सध्या सचिव; मदत व पुनर्वसन बदली सदस्य सचिव; महाराष्ट्र जीवन प्राधिकरण