Join us

मुंबई मेट्रो 3 संदर्भात विचारा प्रश्न, आकाशवाणीवरुन मिळेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 1:10 PM

आकाशवाणीवरील 'एफएम गोल्ड' आणि 'एफएम रेनबो' या रेडिओ चॅनलवर निवेदिका श्रीमती उत्तरा मोने यांच्यासमवेत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती

मुंबई - प्रदूषणविरहित आणि हरित मुंबईचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या मुंबई मेट्रो 3 मार्गिकेच्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती आता आकाशवाणीद्वारे थेट मुंबईकरांना मिळणार आहे. 6 सप्टेंबर 2018 पासून आकाशवाणीवरील 'एफएम गोल्ड' आणि 'एफएम रेनबो' या रेडिओ चॅनलवर निवेदिका श्रीमती उत्तरा मोने यांच्यासमवेत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे "उज्वल भविष्यासाठी मुंबई मेट्रो ३" या विशेष कार्यक्रमांतर्गत स्वतः श्रोत्यांना मुंबईतील भुयारी मार्गावरून धावणाऱ्या मेट्रो 3 मार्गिकेची तसेच या मेट्रोतून होणाऱ्या फायद्यांबद्दल आणि आव्हानाबद्दल माहिती देणार आहेत. 

"उज्वल भविष्यासाठी मुंबई मेट्रो 3" हा कार्यक्रम 6 सप्टेंबरपासून एफएम गोल्ड आणि एफएम रेनबो या दोन रेडिओ स्टेशनवर सुरु होणार आहे. एफएम गोल्डवर दर मंगळवार आणि गुरुवार सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी तर एफएम रेनबोवर दर बुधवार आणि शुक्रवार सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हा कार्यक्रम सुरू होणार आहे. मुंबईकरांसाठी मेट्रो 3 च्या बांधकाम प्रकल्पाबद्दल अधिक माहिती मिळवून घेण्याची ही चांगली संधी आहे. या कार्यक्रमांतर्गत मुंबईकरांना या प्रकल्पासंदर्भातील आपले प्रश्न मांडण्याचीही संधी मिळेल.

टॅग्स :मुंबईमेट्रो