अकबर बिरबल, पंचतंत्रसारख्या लोककथांसाठी अलेक्साकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 08:54 PM2024-02-09T20:54:35+5:302024-02-09T20:54:41+5:30

अकबर बिरबल, तेनालीराम आणि पंचतंत्र यांसारख्या भारतीय लोककथांसाठी अलेक्साकडे मागणी वाढली असल्याचा दावा केला जात आहे.

Ask Alexa for folktales like Akbar Birbal, Panchatantra | अकबर बिरबल, पंचतंत्रसारख्या लोककथांसाठी अलेक्साकडे मागणी

अकबर बिरबल, पंचतंत्रसारख्या लोककथांसाठी अलेक्साकडे मागणी

श्रीकांत जाधव

मुंबई : परस्पर संवादी खेळ, कोडी, नर्सरी राइम्स, शब्दलेखन, सामान्य ज्ञान, इतिहास आणि विज्ञान यांविषयीच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची अधिक क्षमतेचा समावेश असल्याने कुटुंबातील इतर वापरकर्त्यांच्या तुलनेत लहान मुलांकडून अलेक्सासोबत दुप्पट संवाद साधला जात असल्याचे ॲमेझॉनचे म्हणणे आहे. अकबर बिरबल, तेनालीराम आणि पंचतंत्र यांसारख्या भारतीय लोककथांसाठी अलेक्साकडे मागणी वाढली असल्याचा दावा केला जात आहे.

अलेक्सा आणि इको स्मार्ट स्पीकर हे सहा वर्षांपासून भारतीय घरांमध्ये वापरले जात आहेत. अलेक्साची मुलांसाठी सुलभ अशी अनेक उत्पादने सध्या ॲमेझॉन आणि मुंबई लोकल मार्केट मध्ये उपलबद्ध आहेत. याबाबत ॲमेझॉन इंडियाचे ॲलेक्सासाठीचे संचालक दिलीप आर.एस. यांनी गुरुवारी मुंबईत एका कार्यक्रमात संवाद साधला. अलेक्सावरील स्मार्ट होम आणि उत्पादकता वैशिष्ट्ये पालकांना दैनंदिन कामे सोपी करण्यात मदत करू शकतात असा दावा त्यांनी केला आहे.

Web Title: Ask Alexa for folktales like Akbar Birbal, Panchatantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.