सिलिंडर देणाऱ्याला विचारा, लस घेतली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:06 AM2021-05-31T04:06:44+5:302021-05-31T04:06:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असली, तरीदेखील अत्यावश्यक सेवा या सुरूच आहेत. ...

Ask the cylinder giver, did you get the vaccine? | सिलिंडर देणाऱ्याला विचारा, लस घेतली का?

सिलिंडर देणाऱ्याला विचारा, लस घेतली का?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असली, तरीदेखील अत्यावश्यक सेवा या सुरूच आहेत. शहरात घरगुती गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी सुरू आहे. मात्र, घरगुती गॅस घरोघरी पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे लसीकरण झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

घरोघरी जाऊन गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करणारा व्यक्ती कोरोनाच्या संसर्गाला कारणीभूत तर ठरत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या विविध कंपन्या व त्या कंपन्यांच्या अनेक एजन्सी आहेत. या एजन्सीद्वारे शहरातील इमारतींमध्ये, चाळींमध्ये व झोपडपट्ट्यांमध्ये सिलिंडर पोहोचवले जातात. मात्र, अनेक ठिकाणांहून फिरून आलेल्या डिलिव्हरी बॉयमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींना लस द्यायला हवी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील एकूण घरगुती गॅस ग्राहक - ४० लाख

गॅस वितरीत करणाऱ्या एजन्सी - १ हजार

घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी - ८ हजार

किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस - २ हजार

किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस - ४००

एकही डोस न घेणारे कर्मचारी - ५ हजार ६००

५०० डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह

शहरात कोरोनामुळे अनेक डिलिव्हरी बॉयना कोरोनाची लागण झाली. या काळात काही डिलिव्हरी बॉय आपल्या गावी निघून गेले तर अनेक डिलिव्हरी बॉय नव्याने भरती झाले. त्यातील ५०० डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह आले.

डिलिव्हरी बॉय म्हणतात...

भरत पगारे - सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती. यानंतर १८ वयोगटावरील सर्वांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली. या काळात लसीकरणात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. त्यात एक ते दोन दिवस ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी बसलो असता, ते झाले नाही. त्यामुळे येत्या एक ते दोन आठवड्यात लस घेईन.

शिवा नाडर - दोन महिने गावी असल्याने त्याठिकाणी लसीकरण लाभ घेता आला नाही. मुंबईत येऊन एक आठवडा झाला आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात लस घेईन.

जबाबदारी कोणाची?

घरगुती गॅस घरोघरी पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या लसीकरणाची जबाबदारी एजन्सीने घेणे गरजेचे आहे किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लस घेण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे.

सिलिंडर सॅनिटाईज केले का?

कोरोनापासून बचावासाठी सिलिंडर घरात घेतल्यानंतर त्याला सॅनिटाईज करणे गरजेचे असते. सिलिंडर जड असल्याने त्याला उचलताना हातांचा स्पर्श होतो. त्यामुळे त्या सिलिंडरमार्फत कोरोना पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे सिलिंडरवर सॅनिटायझर मारला जावा. परंतु, सॅनिटायझर मारत असताना, घरात गॅस अथवा दिवा सुरू नसावा, याची काळजी घ्यायला हवी.

Web Title: Ask the cylinder giver, did you get the vaccine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.