Join us

अस्लम शेख मुंबई शहराचे;तर आदित्य उपनगरचे पालकमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:24 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. अहमदनगर जिल्ह्याचे असलेले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरचे तर कोल्हापूर जिल्ह्यातील असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना अहमदनगरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना तर उपराजधानी नागपूरचे पालकमंत्रीपद ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना देण्यात आले. अस्लम शेख हे मुंबई शहराचे पालकमंत्री असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याचे तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण्याबरोबरच नक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकमंत्रीपद देण्यात आले. खात्यांबाबत नाराज असलेले विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या चंद्रपूर या गृह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले. महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जिल्ह्यात जास्त आमदार त्या पक्षाकडे पालकमंत्रीपद असे सूत्र ठरले होते. त्याचा फटका काही दिग्गजांना बसला आणि त्यांना इतर जिल्ह्यात जावे लागले.शिवसेनेत चंद्रकांत खैरे विरुद्ध अब्दुल सत्तार या वादाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पालकमंत्रीपद हे उद्योग मंत्री व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्याकडे सोपविण्यात आले असून सत्तार यांना धुळ्यात पाठविण्यात आले.>इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री असेनाशिक- छगन भुजबळ, नांदेड- अशोक चव्हाण, गोंदिया- अनिल देशमुख, सांगली- जयंत पाटील, सोलापूर- दिलीप वळसे-पाटील, रत्नागिरी- अनिल परब, सिंधुदुर्ग - उदय सामंत, पालघर- दादाजी भुसे, धुळे- अब्दुल सत्तार, नंदुरबार- अ‍ॅड. के.सी. पाडवी, जळगाव- गुलाबराव पाटील,सातारा- बाळासाहेब पाटील, जालना- राजेश टोपे, परभणी- नवाब मलिक, बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे, हिंगोली- वर्षा गायकवाड, बीड- धनंजय मुंडे, उस्मानाबाद- शंकरराव गडाख, लातूर- अमित देशमुख, अमरावती- यशोमती ठाकूर, अकोला- बच्चू कडू, वाशिम- शंभुराज देसाई, यवतमाळ- संजय राठोड, वर्धा- सुनील केदार, भंडारा- सतेज ऊर्फ बंटी पाटील, रायगड - आदिती तटकरे.>आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे तर , राऊत नागपूरचे पालकमंत्री,- अजित पवारांकडे पुणे तर, सुभाष देसार्इंकडे औरंगाबाद, एकनाथ शिंदेंकडे ठाण्यासह गडचिरोलीचीही जबाबदारी

टॅग्स :आदित्य ठाकरे