अस्लम शेख यांनी घेतली दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:08 AM2021-02-09T04:08:39+5:302021-02-09T04:08:39+5:30

मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी आंदोलनाच्या ७५व्या दिवशी सिंघू ...

Aslam Sheikh visits agitating farmers in Delhi | अस्लम शेख यांनी घेतली दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट

अस्लम शेख यांनी घेतली दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट

Next

मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी आंदोलनाच्या ७५व्या दिवशी सिंघू बाॅर्डरवर जाऊन केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांची भेट घेतली. काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांसह राहील, असे आश्वासन त्यांनी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना दिले.

या भेटीनंतर अस्लम शेख यांनी केंद्र सरकारवर सडाडून टीका केली. केंद्र सरकारने मंजूर केलेले हे तीन कायदे शेतकऱ्यांना स्वत:च्याच भूमीत मजूर बनवणारे आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किमान समर्थन मूल्य देणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असे ते म्हणाले.

करार शेतीचे आजवर जेवढे प्रयोग देश-विदेशात झाले ते सर्व फसल्याची उदाहरणे ताजी असताना पुन्हा नव्याने काही बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी ‘करार शेतीचा’ घाट घातला जातो आहे. १९५५चा अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करून बड्या कंपन्यांना साठेबाजीसाठी केंद्र सरकारने रान मोकळे करून दिले आहे, असा आरोप शेख यांनी केला. गोर-गरीब जनतेच्या मतांवरती सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला आज तेच गोरगरीब खलिस्तानी व आतंकवादी वाटू लागले यापेक्षा शोकांतिका ती काय, असा सवाल करत हेच शेतकरी बांधव मोदी सरकारला त्यांची जागा दाखवून देतील असेही अस्लम शेख म्हणाले.

Web Title: Aslam Sheikh visits agitating farmers in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.