श्रध्दांजली अर्पण करून सभा तहकूब

By admin | Published: April 15, 2015 10:42 PM2015-04-15T22:42:48+5:302015-04-15T22:42:48+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस समितीच्या २०१५ ते २०१७ या कालावधीत जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणुका घेण्यासंदर्भात बैठकीचे बुधवारी येथे आयोजन करण्यात आले होते.

Assemble the meeting by offering tribute | श्रध्दांजली अर्पण करून सभा तहकूब

श्रध्दांजली अर्पण करून सभा तहकूब

Next

पाली : राष्ट्रवादी काँग्रेस समितीच्या २०१५ ते २०१७ या कालावधीत जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणुका घेण्यासंदर्भात बैठकीचे बुधवारी येथे आयोजन करण्यात आले होते. परंतु आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी अनितामाई यांच्या निधनामुळे श्रध्दांजली अर्पण करण्यात येऊन सभा तहकूब करण्यात आली.
रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे निवडणूक अधिकारी रमेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला प्रांताध्यक्ष आमदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल, आमदार सुरेश लाड, आमदार अनिल तटकरे, रा.जि.प.चे अध्यक्ष सुरेश टोकरे, रा.जि.प.चे शिक्षण सभापती भाईसाहेब पाशिलकर, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माथेरान बंद
माथेरान : अनिताताई धर्माधिकारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने माथेरानमध्येही शोककळा पसरली. माथेरानमधील विविध पक्षांच्या, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी सकाळी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सर्व व्यापारी संघटनेने घेतला.

Web Title: Assemble the meeting by offering tribute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.