जकात फंडच्या माध्यमातून ५ वर्षांत २ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 06:06 AM2019-05-28T06:06:55+5:302019-05-28T06:06:58+5:30

इस्लाममध्ये संपत्तीवर २.५ टक्के देण्यात येणाऱ्या जकातच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत १४४९ जणांना शिक्षणासाठी व स्वयंरोजगार उभारण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे.

Assistance of 2 crores in 5 years through the octroi fund | जकात फंडच्या माध्यमातून ५ वर्षांत २ कोटींची मदत

जकात फंडच्या माध्यमातून ५ वर्षांत २ कोटींची मदत

Next

- खलील गिरकर
मुंबई : इस्लाममध्ये संपत्तीवर २.५ टक्के देण्यात येणाऱ्या जकातच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत १४४९ जणांना शिक्षणासाठी व स्वयंरोजगार उभारण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. असोसिएशन आॅफ मुस्लीम प्रोफेशनल्स (एएमपी) या संस्थेने २०१३ मध्ये सुरू केलेल्या जकात फंडला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एएमपीने २०१३ मध्ये जकात फंड उभारण्यास प्रारंभ केला. पहिल्या वर्षी २ लाख ६ हजार रुपये जमवण्यात संस्थेला यश आले. यामध्ये दरवर्षी सातत्याने वाढ होत गेली. २०१४ ला ७ लाख ९९ हजार, २०१५ ला २० लाख ६५ हजार ४०, २०१६ ला ३८ लाख ७९ हजार ७५०, २०१७ ला ४३ लाख २५ हजार ७७६ व २०१८ ला ६९ लाख ६२ हजार ८०३ रुपये जकात म्हणून जमवण्यात संस्था यशस्वी झाली. २०१३ ते २०१८ दरम्यान १ कोटी ८२ लाख ३८ हजार ३६९ रुपये जमा झाले. यापैकी १ कोटी ८१ लाख ५१ हजार २२३ रुपयांची मदत उच्च शिक्षण, स्वयंरोजगार, अनाथ विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आली.
आतापर्यंत ५३९ जणांना उच्च शिक्षणासाठी मदत, तर ६१८ अनाथांना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे.
>यंदा १ कोटीचे उद्दिष्ट
या वर्षी रमजान महिन्यात एएमपीने जकात म्हणून १ कोटी रुपये जमविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यापैकी ४५ लाख रुपये आजपर्यंत जमा झाले असून उर्वरित रक्कमदेखील लवकर जमा होईल, असा विश्वास एएमपीचे अध्यक्ष अमीर इद्रिसी यांनी व्यक्त केला. २०१३ मध्ये अवघे २ लाख रुपये जमा झाले होते व आम्हाला १५ जणांना त्याचा लाभ देणे शक्य झाले होते. त्यामध्ये दरवर्षी सातत्याने वाढ झाली असून २०१८ मध्ये आम्ही सुमारे ७० लाख रुपये जमविण्यात यशस्वी झालो व त्या माध्यमातून ५८१ जणांना त्याचा लाभ मिळाला, असे इद्रिसी म्हणाले.

Web Title: Assistance of 2 crores in 5 years through the octroi fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.