- यदु जोशीमुंबई : राज्यात अलिकडच्या अतिवृष्टीने तब्बल ८८ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषापेक्षा किमान दुप्पट मदत दिली जाईल आणि त्या बाबतची घोषणा येत्या दोन-तीन दिवसांत केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत दोन हेक्टरपर्यंत दिली जाते. म्हणजे जास्तीत जास्त १३ हजार ६०० रुपये मदतीदाखल दिले जातात. मात्र, अतिवृष्टीमध्ये लाखो शेतकऱ्यांची हाताशी आलेली पिके पूर्णत: वाया गेली आहेत. त्यामुळे या निकषानुसारच मदत दिली तर ती अत्यंत तोकडी असेल. त्यामुळे त्यात मोठी वाढ केली जाणार आहे. हेक्टरी मदत तर केली जाईलच त्या शिवाय इतर प्रकारची (पुढील हंगामासाठी बियाणे, खते) मदत दिली जाईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या बाबत लवकरच निर्णय घेणार आहेत. मदत व पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना राज्यपालांनी शुक्रवारी राजभवनावर बोलविले आहे.नुकसानीबाबत पंचनाम्याचे काम शासकीय यंत्रणेने पूर्ण केले आहे. जवळपास ८८ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकºयांना मदतीपोटी किमान २० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. अवकाळी पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेऊन नुकसानग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत देण्याची भूमिका ‘लोकमत’ने घेतली होती.>धुळ््यातील तिसगाव-ढंडाणे येथील शेतकरी सुनील जयराम पाटील यांनी नुकसानीमुळे त्यांचे कांदा पीक मेंढ्यांना चरण्यासाठी खुले करून टाकले.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जादा मदत; लवकरच निर्णय होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 5:07 AM