सहायक आयुक्तांवर हल्ला , पालिकेचे 6 अधिकारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:06 AM2017-08-05T03:06:07+5:302017-08-05T03:06:10+5:30

महापालिकेच्या के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांच्यावर बुधवारी हल्ला करण्यात आला. पालिका कर्मचारी, पोलीस आणि फेरीवाले यांच्यात धक्काबुक्की झाली.

Assistant Commissioner, attackers, 6 officers injured | सहायक आयुक्तांवर हल्ला , पालिकेचे 6 अधिकारी जखमी

सहायक आयुक्तांवर हल्ला , पालिकेचे 6 अधिकारी जखमी

Next

मुंबई : महापालिकेच्या के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांच्यावर बुधवारी हल्ला करण्यात आला. पालिका कर्मचारी, पोलीस आणि फेरीवाले यांच्यात धक्काबुक्की झाली. या हल्ल्यात जैन यांच्याव्यतिरिक्त सहा पालिका अधिकारी जखमी झाले आहेत. अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना ही घटना घडली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरी कुर्ला रोड, स्टुडंट रोड, सी. जी. रोड परिसरात फूड स्टॉल्स मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतुकीची कोंडी होते, अशी तक्रार पालिकेकडे आली होती. त्यानुसार जैन हे बुधवारी त्यांच्या पथकासह स्टुडंट रोडवर असलेल्या दुकानांवर कारवाईसाठी गेले. त्या वेळी त्या ठिकाणी त्यांच्यावर तसेच सोबत असलेल्या पोलिसांवर तिथल्या दुकानदारांनी हल्ला चढविला, असे जैन यांनी ‘लोकमत’ला सांगितले. धक्काबुक्कीत पालिकेचे सहा कर्मचारीदेखील जखमी झाले. तसेच एक पोलीस कर्मचारी खाली पडल्याने त्यालाही दुखापत झाली. ही घटना एमआयडीसी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर असाच प्रकार अंधेरी-कुर्ला, तसेच सी.जी. रोडवर घडला. त्यानुसार जैन यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी तिघांना अटक केली असून, अटक करण्यात आलेले माथाडी कामगार असल्याचे समजते.
फेरीवाले आमच्यावर दगडफेक करणार होते, असे आम्हाला नंतर पोलिसांकडून समजले, तेव्हा आम्ही अखेरची कारवाई थांबवली. मात्र, या सगळ्या प्रकारावरून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे उघड होत आहे, असे जैन यांनी सांगितले.
मात्र, गुरुवारी पुन्हा एकूण तीनशे स्टॉल्सवर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Assistant Commissioner, attackers, 6 officers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.