खगोलप्रेमींनी पाहिली शुक्र, बुध आणि चंद्राची युती; अवकाश निरीक्षण संख्येत पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 02:03 AM2020-05-26T02:03:42+5:302020-05-26T06:40:38+5:30

आकाशातील दुसरा सर्वांत जास्त चमकणारा हा चंद्र रविवारी रात्री पश्चिम आकाशात पाहायला मिळाला.

Astronomers see the union of Venus, Mercury and the Moon; Emphasis fell on the number of space observations | खगोलप्रेमींनी पाहिली शुक्र, बुध आणि चंद्राची युती; अवकाश निरीक्षण संख्येत पडली भर

खगोलप्रेमींनी पाहिली शुक्र, बुध आणि चंद्राची युती; अवकाश निरीक्षण संख्येत पडली भर

googlenewsNext

मुंबई : मान्सून काही दिवसांवर येऊ ठेपला आहे तरी अवकाश निरिक्षण करणाऱ्यांच्या संख्येत भरच पडत असून, खगोलप्रेमींना लॉकडाउनच्या काळातही अवकाश निरीक्षण करता येत आहे. याच अवकाश निरीक्षणाच एक भाग म्हणून २२ मे रोजी शुक्र व बुध अगदी जवळजवळ दिसला आणि २४ मेच्या रात्रीही शुक्र, बुध आणि चंद्र याची युती खगोलप्रेमींना पश्चिमेच्या आकाशात पाहता आली. सूर्यास्तानंतर काही काळ या तिघांना खगोलप्रेमींना सोबत पाहता आले. खगोलांची अशी युती फारच कमी पाहता येते.

पृथ्वीचा एकुलता एक नैसर्गिक उपग्रह म्हणजे आपला चंद्र होय. आकाशातील दुसरा सर्वांत जास्त चमकणारा हा चंद्र रविवारी रात्री पश्चिम आकाशात पाहायला मिळाला. सूर्यास्तानंतर लगेचच पश्चिमेस चंद्रकोर दिसली आणि चंद्र पाहून सोमवारी रमजान ईद जगभर साजरी झाली. सूर्य आणि चंद्रानंतर आकाशात तिसरा सर्वांत जास्त चमकतो तो एखादा तारा नाही तर तो आहे शुक्र ग्रह. याला सकाळचा तारा किंवा संध्याकाळचा तारा म्हटले जाते. सध्या शुक्र संध्याकाळचा तारा आहे. शुक्र आपण सूर्यास्तानंतर लगेच पश्चिम दिशेत सहज शोधू शकता. गुरू आणि शनी आकाशात एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. गुरूनंतर काही वेळात शनी उगवतो. म्हणूनच आकाशात शनी गुरूच्या जवळ दिसतो.

मंगळ हा ग्रह मध्यरात्रीनंतर उगवतो आणि म्हणूनच पहाटेच्या आकाशात दिसतो. लाल रंगामुळे ओळखला जाणारा मंगळ अंधाºया आकाशातून सहज ओळखता येतो. मात्र शहराच्या आकाशातून तसा फारच पुसट दिसतो. बुध मुख्यत: एक निस्तेज ग्रह आहे. तो नेहमी सूर्याच्या जवळ असतो आणि म्हणून क्वचितच पाहायला मिळतो. पण गेल्या काही दिवसांत, बुध शुक्राच्या अगदी जवळ आकाशात दिसत आहे. बुध जास्त तेजस्वी नसल्यामुळे जरा नीट लक्ष देऊन पाहणे गरजेचे आहे.

शुक्रानंतर ग्रहांमध्ये गुरू चमकदार दिसतो. म्हणूनच शहराच्या आकाशातूनसुद्धा सहज ओळखता येतो. गुरू जवळजवळ वर्षभर एका नक्षत्रात राहतो. आजकाल गुरू मध्यरात्री उगवतो. मग रात्रभर आकाशात दिसत असल्यामुळे अनेकांनी त्याला उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.

ध्रुवतारा दिसायला अतिशय अंधुक

ध्रुवतारा हा आकाशातील सर्वांत जास्त चमकणारा तारा आहे, असा गैरसमज अनेकांना आहे. त्यामुळे बरेच जण शुक्राला ध्रुवतारा समजण्याची चूक करतात. ध्रुवतारा दिसायला अतिशय अंधुक आहे. मुंबईसारख्या शहरातून तो सहजपणे दिसतच नाही. ध्रुवतारा पाहण्यासाठी शहराच्या प्रकाशापासून दूर असलेल्या गडद आकाश असलेल्या ठिकाणी जावे लागते.

Web Title: Astronomers see the union of Venus, Mercury and the Moon; Emphasis fell on the number of space observations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.